Arunachal Pradesh Tour Details Saam TV
लाईफस्टाईल

Arunachal IRCTC Package: अरुणाचल प्रदेशमध्ये ८ दिवस फिरा, फ्रीमध्ये खाण्याची अन् राहण्याची सोय, वाचा IRCTC नवं पॅकेज

Ruchika Jadhav

वीकएंड किंवा दोन महिन्यातून एकदा तरी काही पर्यटनप्रेमी बाहेर फिरण्याचा प्लान करत असतात. अरुणाचल प्रदेशमधील निसर्ग, तेथील हिरवळ गर्द झाडी, डोंगर कपाऱ्या आणि नदी पाहून डोळ्यांना वेगळंच सुख आनंद मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये दरवर्षी अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असातात. आता तुम्ही देखील येथे जाण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी येथे फिरण्याचं एक बजेटमधलं पॅकेज शोधलं आहे.

IRCTC कडून पॅकेज जाहीर

IRCTC कडून अरुणाचल प्रदेशमध्ये फिरण्यासाठी एक पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. या पॅकेजची किंमत फक्त ३० हजार ९३० रुपये इतकी आहे. गुवाहाटी येथून याची सुरुवात होत असून ८ दिवसांसाठी तुम्हाला अरुणाचल प्रदेशमध्ये फिरता येणार आहे.

शुक्रावारी प्रवासाला सुरुवात

या टूर पॅकेजमध्ये प्रत्येक शुक्रवारी प्रवासाला सुरुवात होणार आहे. यामध्ये प्रवाशांना ७ दिवस आणि ८ रात्र फिरण्यासाठी मिळणार आहेत. या टूर पॅकेजमध्ये तेजपूर, भालुकपोंग, दिरांग, तवांग आणि बोमडिला येथे फिरता येणार आहे.

टूर पॅकेजमध्ये मिळतील या सुविधा

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना राहण्याची आणि खाण्या-पिण्याची फ्रीमध्ये सुविधा असणार आहे. यामध्ये एसी टँपो, ट्रॅवल्स आणि मिनी बसने प्रवास होणार आहे. हा प्रवास देखील मोफत असणारे. तसेच याच पॅकेजमध्ये पर्यटकांना एक गाइड देखील मिळणार आहे.

पाहा पॅकेज कसं आहे?

सोलो ट्रिप करत असाल तर एका व्यक्तीसाठी ४४,९०० रुपये. दोन व्यक्ती एकत्र प्रवास करणार असतील तर त्यांना प्रत्येक व्यक्तीसाठी ३३,३७० रुपयांचं पॅकेज असणारा आहे. तसेच ३ व्यक्ती एकत्र फिरणार असतील यातील प्रत्येक व्यक्तीला त्याहूनही कमी म्हणजे फक्त ३०,९३० रुपये भरावे लागणारेत. ५ ते ११ वर्षांची मुलं सोबत असतील तर त्यांच्यासाठी २५,६९० रुपये आणि २ ते ४ वर्षांच्या मुलांसोबत १८,७६० रुपये दिले जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT