Best Yoga For Belly Fat Saam Tv
लाईफस्टाईल

Best Yoga For Belly Fat: पोटावरची चरबी वाढलीये ? काहीही केलं तरी रिजल्ट मिळत नाही, हे 3 योगासने ठरतील फायदेशीर

Yog Asanas To Reduce Belly Fat: बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वाढते वजने ही एक समस्या बनत आहे.

कोमल दामुद्रे

International Yoga Day : हल्ली प्रत्येक तरुण हा वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. वाढत्या वजनांचा विळखा हा हल्ली तरुण वर्गात अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वाढते वजने ही एक समस्या बनत आहे.

वाढत्या वजनावर (Weight) नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काही ना काही करत असतो. डाएटपासून ते जीमपर्यंत अनेक गोष्टी करतो पण आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही. परंतु, जर तुम्ही नियमितपणे काही योगासने (Yoga) केली तर तुमची वाढलेली ढेरी कमी होऊ शकते जाणून घेऊया काही योगासने.

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yog day). २१ जून रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. यंदा यंदा जगभरात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने जाणून घेऊया आरोग्याच्या समस्यावर कशी मात करता येईल ते.

1. त्रिकोणासन

जर तुमच्या पोटावर चरबी वाढली असेल तर त्रिकोणासन तुमच्यासाठी खूप चांगले आहे. योगाचे हे आसन केवळ पचन सुधारत नाही, तर पोट आणि कंबरेवर साठलेली चरबी कमी करण्यासही ते उपयुक्त आहे. या आसनामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो आणि तो सुधारतो. हे आसन केल्याने तुमचे संतुलन आणि एकाग्रताही सुधारते.

2. सर्वांगासन

सर्वांगासन देखील वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते तसेच शरीराला शक्ती मिळते. यासोबत ते मेटाबॉलिज्म वाढवते. यासोबतच थायरॉईडची पातळी संतुलित ठेवते. या आसनामुळे पोटाचे स्नायू आणि पाय मजबूत होतात. तसेच श्वसन प्रणाली सुधारते.

3. विरभद्रासन

मांड्या आणि खांद्याचे वजन कमी करायचे असल्यास विरभद्रासन उपयुक्त ठरू शकते. विरभद्रासन तुमची पाठ, पाय आणि हातांना टोन करते तसेच तुमचे संतुलन सुधारते. हे तुमच्या पोटाला टोनिंग करण्यास देखील मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT