Budget Trip Saam tv
लाईफस्टाईल

Budget Trip : ५० हजारांच्या आत फिरा परदेशातील ५ पर्यटनस्थळे, बजेटमध्ये टूर होईल जबरदस्त

5 Places To Travel Out Of India : अनेकांना असे वाटते आयुष्यात एकदा तरी आपण परदेशात फिरायला जायला हवे. प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये परदेशातील वारी एकदा तरी व्हावी अशी इच्छा असते.

कोमल दामुद्रे

Budget International Trip :

वाढत्या कामाच्या व्यापामुळे अनेकांना लांब असे फिरायला जाता येत नाही. परंतु, मुलांना सुट्ट्या लागल्या की, अनेकांना फिरायला जाण्याचे वेध लागतात. फेब्रुवारी- मार्च महिन्यात हवामानात बदल होत असतो. प्रवास करण्यासाठी हा ऋतू अधिक चांगला मानला जातो.

अनेकांना असे वाटते आयुष्यात एकदा तरी आपण परदेशात फिरायला (Travel) जायला हवे. प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये परदेशातील वारी एकदा तरी व्हावी अशी इच्छा असते. परंतु, बजेट कोलमडू शकते. परंतु, आम्ही तुम्हाला काही असे पर्यटनस्थळे सांगणार आहोत जिथे तुम्ही स्वस्तात मस्त फिरु शकता.

1. नेपाळ

भारताच्या सीमेलगत असणारा देश नेपाळ. कमी वेळ आणि कमी बजेटसाठी हे ठिकाण खूप चांगले आहे. नेपाळमध्ये ५ ते ६ दिवसांच्या टूरसाठी (tour) प्रत्येक व्यक्तीला २५ ते ३० हजार रुपये खर्च साधारणपणे येईल. तुम्ही कमी बजेटमध्ये नेपाळमधील सुंदर मठ, माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प, मंदिरे इत्यादींना भेट देऊ शकता. दिल्ली ते काठमांडूवरुन फ्लाइट सहज मिळू शकते. दीड तासात नेपाळला पोहोचता येते. तसेच बस सेवा देखील उपलब्ध आहे.

2. थायलंड

भारतातून प्रवास करण्यासाठी खिशाला परवडणारा देश शोधत असाल तर थायलंड ही जागा चांगली आहे. या ठिकाणी तुम्हाला आधुनिक- सांस्कृतिक, भव्य शाही राजवाडे, प्राचीन अवशेष पाहायला मिळते. या ठिकाणी राहाण्यासाठी तुम्हाला १२०० रुपये मोजावे लागतील. एका व्यक्तीसाठी ७ दिवसांच्या सहलीचा खर्च ३०,००० रुपये (Price) इतका येतो.

3. बाली

बाली हे भारतीय पर्यटकांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. येथील बेटांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. यामुळे वर्षभर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात या ठिकाणी भेट देता येईल. ५ ते ६ दिवसांसाठी प्रवास करत असाल तर ४० हजार रुपयांचा खर्च येईल.

4. तैवान

तैवानची नाइटलाइफ ही अनेकांना भूरळ घालते. रात्रीच्या वेळी येथील सौंदर्य पाहाण्यासारखे आहे. या ठिकाणाची खडक आणि त्याच्या आजूबाजूला असणारी छोटी बेटे. येथे हॉटेलचा दिवसाला खर्च हा १७००-२००० रुपये इतका आहे. या ठिकाणी ४ ते ५ दिवसांची ट्रिप प्लान करु शकता.

5. दुबई

कमी खर्चात दुबईतील ग्लॅमरस डेस्टिनेशनचा प्लान तुम्ही करु शकता. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला फ्लाइटसाठी १७,५०० रुपये मोजावे लागतील तर हॉटेलसाठी २ ते ३ हजार रुपये खर्च करावे लागतील. तर ६ दिवसांसाठी प्रति व्यक्तीचा खर्च हा ४० ते ५० हजार इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT