खाद्य पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य माणसांना आणखी एक मोठा झटका बसणार आहे. माहितीनुसार, पुढील महिन्यापासून एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन महाग होऊ शकतात. सरकार वॉशिंग मशीन, फ्रीज आणि एसी यासारख्या व्हाईट गुड्स वर GST वाढवण्याचा विचार करत आहे. याचा निर्णय पुढील महिन्यातील GST कॉउंसिल (GST Council) बैठकीत होणार आहे. रिपोर्टनुसार, काही निवडक व्हाईट गुड्सवर GST 18 टक्क्यांवरून वाढून 28 टक्के केलं जाऊ शकत.
त्यामुळे जर तुम्ही उन्हाळाच्या दिवसांत या वस्तू विकत घेण्याच्या प्लॅन करत आहेत तर वस्तू खरेदी कराव्यात तर त्वरित करून घ्या. पुढील महिन्यापासून यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. सध्या व्हाईट गुड्स 18 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये आहेत. चार वर्षांपूर्वी सरकारने व्हाईट गुड्सवरील जीएसटी दर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणला होता.
CNBC-Awaaz च्या अहवालानुसार, मंत्री गटाचा अहवाल (GoM) आणि GST कौन्सिलची बैठक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सुमारे 25 वस्तूंवरील कपातीच्या जुन्या निर्णयांचा आढावा घेतला जाणार आहे. निवडक व्हाईट गुड्सवरीजीएसटी दर वाढू शकतात. व्हाईट गुड्सवरील जीएसटीचा दर 16 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
सरकार जीएसटी स्लॅब कमी करण्याच्या तयारीत;
केंद्र सरकार जीएसटीचे सध्याचे चार स्लॅब तीनपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. भारतात सध्या GST चे चार स्लॅब आहेत - 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. या योजनेंतर्गत सरकार 12 आणि 18 टक्के स्लॅब काढून 15 टक्के नवीन स्लॅब बनवू शकते. यासह, 5 टक्क्यांचा स्लॅब 6 किंवा 7 टक्क्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. 28 टक्के स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्याची कोणतीही योजना नाही, म्हणजेच हा स्लॅब 28 टक्क्यांवर स्थिर राहील. देशाच्या एकूण जीएसटी संकलनापैकी 70 टक्के रक्कम 18 टक्के कर स्लॅबमधून येते. 18 टक्के स्लॅबमध्ये 480 वस्तू आहेत.
सध्या, 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये फ्रोझन भाज्या, फटीलायझर्स, मसाले प्लासिक वेस्ट आहे. तर 12 टक्क्याच्या स्लॅबमध्ये तूप, दाणे, फळ, पर्स, हॅन्डबॅग या वस्तू येतात, 18 टाक्यांच्या स्लॅबमध्ये वॉशिंग मशीन, एसी, फ्रिज, कॅमेरा, शाम्पू या वस्तू तर 28 टाक्यांच्या स्लॅबमध्ये मोटारसायकल, पण मसाला सनस्क्रीन या वस्तू येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.