

पुरेशी झोप घेणे हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. असे म्हटले जाते की व्यक्तीने रात्री कमीतकमी 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. पण काही कारणास्तव झोप पुरेशी न झाल्यास त्याचा सर्वात वाईट परिणाम मेंदूवर होतो. लोक अनेकदा तणावात असतात आणि यामुळे त्यांना त्यांची रोजची कामे नीट करता येत नाहीत. स्लीपिंग डिसऑर्डर (Sleeping Disorder) ही एक समस्या आहे, परंतु 6 तासांपेक्षा कमी झोपेपेक्षा ती अधिक गंभीर आहे. अनेकांना अशी सवय असते की ते 6 तासही नीट झोपत नाहीत.
तज्ञांच्या मते, 6 तास किंवा त्याहून कमी झोप घेतल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे तुम्हाला नेहमी सर्दी खोकला आणि शरीराच्या अन्य समस्यांचा सामना करावा लागतो. कमी झोपेचे परिणाम मेंदूवर दिसून येऊ लागतो.
ताण;
जर तुम्ही 6 तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेत असाल, तर एक वेळेनंतर तुमची मानसिक स्थिती बिघडू लागते आणि तुम्ही तणावात जाऊ शकता. हा ताण कधी कधी आता वाढतो की, लोक डिप्रेशनमध्ये जातात. असे म्हण्टले जाते की, झोप न येणे आणि डिप्रेशन एकमेकांशी सलंग्न आहेत. जर तुम्ही डिप्रेशनध्ये आहेत तर तुम्हला नीट झोप येणार नाही अन् जर झोप पूर्ण होत नसेल तर तुम्ही डिप्रेशनध्ये असू शकता.
स्मरणशक्तीवर प्रभाव;
ज्या लोकांना झोप 6-7 तास घ्यायची सवय असते त्यांना स्मरणशक्ती कमकुवत होण्याची तक्रार असते. अशी लोकं सारखे विचारात मग्न असतात तसेच ते गोष्टी विसरत असतात. जर तुम्हालाही झोप न येण्याची समस्या आहे तर या परिस्थितीत डॉक्टरांकडे जा. तसेच तुम्ही योगाच्या माध्यमातून देखील ही समस्या दूर करू शकता.
हे देखील पहा-
लक्ष केंद्रित न करू शकणे;
कमी झोप किंवा अनिद्राने ग्रासलेल्या लोकांच्या मेंदूवर अत्यंत वाईट परिणाम होतो. त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमजोर पडू लागते. त्यांना हवे असले तरी ते कोणत्याही महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि यामुळे मोठे नुकसानही होऊ शकते. निद्रानाशाची समस्या असो किंवा काही कारणास्तव तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, पण या समस्येवर उपाय म्हणजे पुरेशी झोप हेच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.