High Cholesterol Saam Tv
लाईफस्टाईल

High Cholesterol : भारतीय तरुणांमध्ये वाढतेय कोलेस्टेरॉलचे प्रमाण, या चुकीच्या सवयींमुळे गमवावा लागू शकतो जीव

Indian Youth Victims Of Cholesterol Disease : चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि पौष्टिक आहार यामुळे भारतीय तरुणांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक वाढत आहे. कोलेस्टेरॉल हे हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाचे सगळ्यात मोठे कारण आहे.

कोमल दामुद्रे

High Cholesterol Symptoms :

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि पौष्टिक आहार यामुळे भारतीय तरुणांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक वाढत आहे. कोलेस्टेरॉल हे हृदयविकार, मधुमेह (Diabetes) आणि लठ्ठपणाचे सगळ्यात मोठे कारण आहे.

वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे अनेक आजार (Disease) बळावतात. जाणून घेऊया भारतीय तरुणांमध्ये कोलेस्टेरॉल का वाढतो आहे.

1. भारतीय तरुणांमध्ये कोलेस्टेरॉल का वाढतोय?

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील अंतर्गत औषध विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरणजीत चॅटर्जी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली की, माझ्याकडे असे अनेक रुग्ण आहेत जे २० वर्षांचे आहेत. जे कोलेस्टेरॉलसारख्या आजाराला बळी पडले आहेत. उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे (Symptoms) फार लवकर दिसत नाही. त्यामुळे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडतात, प्लेकमुळे उच्च कोलेस्टेरॉल होतो.

2. कोलेस्टेरॉलची लक्षणे कोणती?

उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे सहसा दिसून येत नाही. परंतु, उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. त्यासाठी कोलेस्टेरॉल नियमितपणे तपासणे गरजेचे आहे.

3. तरुणांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याचे कारण

आहारातील चुकीच्या सवयींमुळे, फास्ट फूड, खराब जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढते. याचे कारण अनुवंशिकता आणि मधुमेह देखील असू शकतो.

4. उपचार

उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. २० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या तरुणांनी त्यांचे कोलेस्टेरॉल नियमितपणे तपासायला हवे. तसेच दर पाच वर्षांनी त्यांचे कोलेस्टेरॉल तपासायला हवे. ज्यामुळे आपल्याला आरोग्याची स्थिती कळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT