Parenting Tips Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : लहान मुलांना 'या' सवयी लावा; हुशार अन् इंटेलिजंट होतील

Parenting Tips : लहान मुलांना आधीपासून काही चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे. या सवयींमुळे लहान मुलं हुशार होतात. लहान मुलांना वेळीच चांगल्या सवयी असल्यास ते वाईट मार्गालाही जात नाहीत.

Ruchika Jadhav

आपलं मुल हुशार आणि सर्वांमध्ये इंटेलिजंट असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी प्रत्येक पालक विविध पद्धतीने मुलांवर संस्कार करत असतात. अशात लहान मुलांना आधीपासून काही चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे. या सवयींमुळे लहान मुलं हुशार होतात.

सकाळी लवकर उठणे

सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. लहान मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय असणे गरजेचं आहे. त्यामुळे संपूर्ण मोठा दिवस मिळतो. जास्त वेळ असल्याने सकाळपासूनच मुलांना विविध अॅक्टीवीटी करता येतात.

रात्री लवकर झोपणे

लहान मुलांना सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्री लवकर झोपणे देखील गरजेचे आहे. मुलं खेळकर असल्याने जास्त दमतात. त्यामुळे त्यांना ११ तासांची झोप मिळालीच पाहिजे. लहान मुलांना जास्त झोप मिळाल्यास त्यांची शारीरीक आणि मानसीक स्थिती चांगली राहते.

देवपूजा

लहान मुलांना देवपूजा शिकवा. लहान मुलांचं मन फार चंचल असतं. ते लगेचच अनेक गोष्टी कॅच करतात. त्यांमुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मीक, देवपूजा पाठ यांचे संस्कार करा. पूजापाठ केल्याने मन आणखी प्रसन्न राहते.

महापुरुषांची माहिती द्या

मुलं शाळेत जातात तेव्हा इतिहास विषयात त्यांना आपल्या महापुरुषांची महिती मिळते. त्यामुळे तुम्ही देखील मुलांना विविध महापुरूषांची माहिती द्या. तसेच महापुरुषांच्या वास्तू, किल्ले असलेल्या ठिकाणी मुलांना फिरण्यासाठी घेऊन जा.

वाचनाची सवय

वाचनाची सवय फार महत्वाची आहे. अनेक लहान मुलांना पालक खेळण्यासाठी फोन देतात. मात्र त्याने लवकरच लहान मुलांना आंधळेपणा येतो. त्यामुळे बाहेर खेळल्यानंतर बाकीचा वेळ मुलांना विविध गोष्टींची पुस्तके वाचण्याची सवय लावा.

टीप: ही फक्त सामान्य माहिती आहे. लहान मुलांच्या संगोपनासाठी दिलेल्या माहितीचा साम टीव्ही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT