Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Healthy and Tasty Dishes For Children : लहान मुलांच्या जिभेचे चीचलेही जास्त असतात. अनेक पदार्थ ते खात नाहीत. त्यामुळे आज लहान टिफीनमध्ये देता येतील अशा काही पदार्थांची माहिती जाणून घेऊ.
Children Lunch Box
Children Lunch Box Saam TV

लहान मुलांच्या टिफिनला रोज नवीन काय द्यावे हा प्रत्येक आईसाठी मोठा टास्क असतो. लहान मुलांची पचन क्षमता नाजूक असते. त्यामुळे त्यांना योग्य आणि हलका आहार द्यावा लागतो.

Children Lunch Box
Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

तसेच लहान मुलांच्या जिभेचे चोचलेही जास्त असतात. अनेक पदार्थ ते खात नाहीत. तर अशावेळी त्यांना टिफीन देताना चमचमीत आणि स्वादिष्ट पण त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन टिफीन द्यावा लागतो. त्यामुळे आज लहान मुलांच्या टिफीनमध्ये देता येतील अशा काही पदार्थांची माहिती जाणून घेऊ.

पोहे

पोहे पचायला हलके असतात. त्यामुळे लहान मुलांसाठी तुम्ही तिफिनला पोहे देऊ शकता. त्याने पोट देखील भरते. पोह्यांमध्ये थोडी साखर आणि भाजलेले शेंगदाणे देखील टाकावेत त्याने पोह्यांची चव आणखी वाढवते.

मसाला कॉर्न

मसाला कॉर्न दिसायला फार टेमटिंग असतात. त्यामुळे लहान मुलांना हे कॉर्न पाहताच खाण्याची इच्छा होते. कॉर्न पाण्यात शिजवून त्याला जिरे मोहरी आणि कांदा टोमॅटो अशी फोडणी देऊ शकता. गोड कॉर्न आणि चटपटीत मसाल्यामुळे मुलं हा टिफीन अगदी 2 मिनिटांत फिनिश करतील.

सँडविच

लहान मुलं चपाती भाजी खाण्यास कंटाळा करतात. अशावेळी त्यांच्या पोटात पौष्टिक गोष्टी जाव्यात यासाठी तुम्ही त्यांना बीट रूट सँडविच देऊ शकता. उकडलेला बटाटा, बीट यांची गोल चकती कापून घ्या. त्यावर गोल टोमॅटो आणि कांदा देखील बारीक कापून घ्या. ब्रेड किंवा पोळीमध्ये देखील तुम्ही लहान मुलांना मस्त सँडविच बनवून देऊ शकता.

फ्राईड राईस

लहान मुलं सध्या भात खात नाहीत. त्यांना त्यामध्ये काहीतरी नवीन दिसलं की तेव्हाच ते खातात. त्यामुळे तुम्ही फ्राईड राईस बनवू शकता. यासाठी भात आणि त्यामध्ये विविध भाज्या आणि मसाले टाकून परतून घ्या. अशा चविष्ट भात पाहून मुलं यावर चांगलाच ताव मारतात.

Children Lunch Box
Pickles For Fasting : उपवासासाठी स्पेशल चटकदार आंबट गोड लोणचं रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com