diet for weight loss, carbohydrates for weight loss, weight loss tips at home
diet for weight loss, carbohydrates for weight loss, weight loss tips at home ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या कार्बोहाइड्रेटचा आहारात समावेश करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढलेले वजन ही सगळ्यात मोठी समस्या आहे. वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच ते कमी करणे कठीण. वजन कमी करण्यासाठी आपण इतर अनेक गोष्टींचा विचार करतो. योगा, जीम व व्यायामसारखे पर्याय आपल्याकडे नेहमी असतात. (Diet plan for weight loss in Marathi)

हे देखील पहा-

बऱ्यापैकी लोक हे वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असतात. खाण्यापिण्याच्या किती जरी सवयी बदल्या तरी देखील वजन काही कमी होत नाही अशावेळी पर्यायी म्हणून आपण काही काढे व औषधांचा वापर करतो व त्यामुळे आरोग्याला हानी होते. वजन कमी करण्यासाठी आपल्याला बरेचजण अनेक सल्ले देतात. कार्बोहाइड्रेट हे वजन कमी करण्यासाठी उत्तम स्त्रोत समजले जाते. यातून अनेक फायबर व कॅलरीज आपल्या शरीराला मिळते. अशावेळी आपण कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा ते पाहूया. (weight loss tips at home)

१. वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात अधिक कार्बोहाइड्रेटचा समावेश कशा पध्दतीने होईल याचा विचार आपण करायला हवा. कार्बोहाइड्रेटचा समावेश केल्यानंतर आपले वजन नियंत्रणात राहू शकते.

२. आपण कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश करु शकतो. यात प्रथिने, लोह, जीवनसत्तवे व इतर अनेक पोषक घटक आढळतात. ज्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होईल. याचे सेवन केल्याने आपले पोट भरलेले राहते व आपल्याला भूक लागत नाही.

३. ग्रीन टी ला वजन कमी करण्याचे उत्तम स्त्रोत मानले जाते. यात भरपूर प्रमाणात कार्बोहाइड्रेटचा समावेश आहे. ज्यामुळे आपली रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

४. आपल्या आहारात आपण हिरव्या पालेभाज्या व फळांचा (Fruit) समावेश करायला हवा. यामुळे आपल्याला शरीराला फायबर मिळते व आपले वजन वाढत नाही. फायबरमुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते ज्यामुळे पोटासंबंधीच्या समस्या कमी होतात.

५. तसेच वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आहाराबरोबर व्यायाम देखील करणे अधिक गरजेचे आहे. व्यायाम केल्याने आपले वजन कमी होते परंतु आपल्याला ऊर्जा देखील प्राप्त होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Today's Marathi News Live : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अनिल जाधव भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT