सतत औषध खाल्ल्याने होऊ शकतो आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम!

ऋतूमानानुसार व वाढत्या प्रदूषणामुळे आपण सतत आजारी पडतो.
Taking too much antibiotics are bad for health
Taking too much antibiotics are bad for healthब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ऋतूमानानुसार व वाढत्या प्रदूषणामुळे आपण सतत आजारी पडतो. काही वेळा कामाच्या अतिताणामुळे आपल्याला डोकेदुखी व अंगदुखीसारखे आजार जडतात.

हे देखील पहा -

आपल्यापैकी बरेच लोक आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा फस्ट एड किटमधले औषधे आपण खातो. पोटदुखी, अंगदुखी व ताप किंवा यांसारख्या छोट्या आजार झाल्यावर डॉक्टरकडे जाणे आपण टाळतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेतल्यास आपल्याला इन्फेक्शन किंवा इतर आजारांना सामोरे जावे लागू शकते. एँटीबायोटिक्स औषधांचा वापर केल्याने आपल्या आरोग्याला नुकसान कसे होईल ते पाहूया

एँटीबायोटिक्स औषधांचा आरोग्याला दुष्परिणाम कसा होईल-

१. ऋतूमानाच्या बदलानुसार मुले सहज आजारी पडतात. त्यामुळे त्यांना सर्दी खोकल्यासारखे आजार होतात. अशावेळी आपण त्यांना काही औषधे देतो त्यामुळे त्यांना अतिसाराचा धोका वाढू शकतो.

Taking too much antibiotics are bad for health
Fitness Tips : वर्कआउट करण्याची योग्य वेळ सकाळी की, संध्याकाळी ?

२. पोटात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या जीवाणूंचा समतोल राखणे आवश्यक आहे. एँटीबायोटिक्स प्रमाण जास्त झाल्याने ते आपल्या पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करू लागतात. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवते.

३. बऱ्याच वेळा (Time) एँटीबायोटिक्सचे सेवन केल्याने आपल्याला ऍलर्जी होते अशावेळी ती औषधे पुन्हा घेताना डॉक्टारांचा (Doctor) सल्ला घ्या व पुन्हा घेताना त्याचे प्रमाण कमी करा.

४. एँटीबायोटिक्सचे सेवन केल्याने शरीरात चांगल्या बॅक्टेरियाच्या कमतरतेमुळे, बुरशीजन्य संसर्गासारख्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच पचनास असमर्थता, उलट्या, मळमळ, पोट फुगणे, भूक न लागणे किंवा पोटात जास्त दुखणे यांसारखी पचनाशी संबंधित लक्षणे दिसू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com