Bhagavad Gita saam tv
लाईफस्टाईल

Bhagavad Gita: भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली आहेत ४ महापापं; अशी कामं केल्यास कधीच मिळू शकणार नाही माफी

Bhagavad Gita : भगवद्‌गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांची माहिती देण्यात आली आहे. याचं योग्य पद्धतीने पालन केल्यास आयुष्यात समस्या येणार नाहीत. जाणून घेऊया गीतेमध्ये असं काय नमूद करण्यात आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. यामध्ये जीवनातील निर्णायक प्रसंगी श्री कृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगतात. असं मानलं जातं की, गीतेमध्ये दिलेले ज्ञान हे अमूल्य आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाने गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे पालन केल्यास जीवनात कधीच अपयशाचा सामना करावा लागणार नाही.

गीता या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या उपदेशांमध्ये ५ अशा गोष्टी आहेत, ज्या आपण करणं टाळलं पाहिजे. या गोष्टी महापापाच्या श्रेणीमध्ये असल्याने ही कामं न करणं फायदेशीर ठरतं.जर तुम्ही ही काम केलीत तर त्याची शिक्षाही तुम्हाला भोगावी लागू शकते.

हिंसा

गीतेमध्ये देण्यात आलेल्या उपदेशांनुसार हिंसा करू नये. मग ती हिंसा शारीरिक असो वा मानसिक. या दोन्ही बाबतीत महापापाच्या श्रेणीत येतात. श्रीकृष्णांनी गीता या ग्रंथामध्ये सर्वांना हे पाप टाळण्याचा सल्ला दिलाय. यावेळी जर तुम्ही कोणाचं मन दुखवलं असेल तर तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच मिळू शकते.

वाईट काम

महिलांचा छळ करणं किंवा महिलांसोबत वाईट कृत्य करणं हे देखील एक मोठं महापाप आहे.त्यामुळे जर एखादा पुरुष असं वाईट कृत्य करत असेल तर त्याला याची शिक्षा भोगावी लागू शकते. महिलांचा सन्मान आणि रक्षा करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे.

अहंकार

भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, मत्सर आणि अहंकार माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. जो व्यक्ती अंहाकाराखाली असतो त्याला चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी यामधील फरक समजत नाही. यावेळी तो अशा काही चुका करतो.

कोणत्याही पद्धतीची चोरी

भगवद्गीतेतही चोरी हे महापाप मानलं गेलंय. गीतमध्ये चोरी म्हणजे केवळ पैशांची किंवा मालमत्तेची नाही तर एखाद्याच्या यशात अडथळा आणणं हे देखील त्यात श्रेणीमध्ये वर्गिकृत केलं आहे. जर तुम्ही एखाद्याचं नाव खराब केलंत किंवा कोणाच्या मेहनतीवर पाणी फेरलत तर तुम्हाला याची शिक्षा येत्या काळात भोगावी लागू शकते.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT