Bhagavad Gita saam tv
लाईफस्टाईल

Bhagavad Gita: भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली मनुष्याच्या बर्बादीची कारणं; वेळीच व्हा सावध

Bhagavad Gita: गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे पालन केल्यानंतर व्यक्तीला जीवनात कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही. गीतमध्ये नमूद केलेले हे उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले होते.

Surabhi Jagdish

आपल्या देशात सर्वात महत्त्वाची भगवद् गीता मानली जाते. कुरुक्षेत्रमध्ये लढल्या गेलेल्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने अजुर्नाला खास उपदेश दिले होते. भगवान कृष्णांनी दिलेल्या या उपदेशांचं वर्णन भगवद् गीतेमध्ये करण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की, गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे पालन केल्यानंतर व्यक्तीला जीवनात कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही.

गीता या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या उपदेशांमध्ये असे ५ उपदेश आहेत, जे मनुष्याच्या बर्बादीचं कारण बनू शकतं, असं म्हटलं गेलंय. गीतमध्ये नमूद केलेले हे उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले होते. हे ते उपदेश आहेत, जे सुखी माणसाचं आयुष्य देखील बर्बाद करू शकतात.

जाणून घेऊया हे उपदेश काय आहेत-

गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटलं आहे की, झोप, थकवा, भय, क्रोध या गोष्टींना टाळणारी सवय तुमच्या बर्बादीचं पहिलं कारण ठरू शकतं. जर एखादा व्यक्ती या गोष्टींची टाळाटाळ करत असेल तर त्याचं बर्बाद होणं निश्चित आहे.

गीतेमध्ये नमूद केल्यानुसार, तुम्ही कोणत्या परिस्थितीत निर्णय घेताय हे देखील महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जास्त खूश असाल किंवा अत्यंत दुखी असाल अशा वेळी मोठे निर्णय कधीही घेऊ नये. असा परिस्थिती व्यक्ती कधीही योग्य निर्णय घेत नाही.

श्रीकृष्ण म्हणतात की, तुम्ही कधीही ध्यैर्य गमावू नका. श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार, प्रतिकूल परिस्थितीत धैर्य गमावणारे कधीही यशस्वी होत नाहीत. जर तुम्ही कठीण परिस्थितीत देखील सकारात्मक विचार करत असाल तर तुम्ही पराभूत होऊ शकत नाही.

तुमच्या सर्व गोष्टींना तुम्ही कोणाला जबाबदार धरताय हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीमध्ये स्वतःला बदलण्याची ताकद नसते, त्यावेळी तो त्याचे दोष देवाला देतो. मात्र अशा व्यक्ती कधीही आयुष्यात यशस्वी होत नाहीत.

कधीही कोणत्याही व्यक्तीला पैशांचा गर्व नसावा. पैसा आल्यानंतर व्यक्ती स्वतःला श्रीमंत समजू लागतो. त्यामुळे तुम्ही चुकूनही असं वागू नका.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT