Drinking water kitchen
Drinking water kitchensaam tv

Vastu Tips : किचनमध्ये 'या' दिशेला ठेवा पिण्याचं पाणी; घरात बरसू लागेल पैसाच पैसा

Vastu Tips : वास्तू शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी खास नियम देण्यात आले आहेत. या नियमांनुसार, त्या-त्या जागी संबंधित गोष्टी ठेवल्या पाहिजेत.
Published on

ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. वास्तू शास्त्रामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होते. शास्त्रामध्ये असं नमूद करण्यात आलंय की, तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. वास्तू शास्त्रामध्ये, घरातील प्रत्येक कोपऱ्याबाबत तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे.

वास्तूनुसार, तुमच्या घरातील किचनची दिशा योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे किचनमधील गॅस आणि सिंक योग्य ठिकाणी असलं पाहिजे, त्यानुसार पिण्याचं पाणी ठेवण्याच्या दिशेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

वास्तू शास्त्रामध्ये किचनमध्ये पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी खास नियम दिले आहेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर आज जाणून घेऊया किचनमध्ये पिण्याचं पाणी कोणत्या दिशेला असलं पाहिजे?

Drinking water kitchen
तुमच्या बेडरूममध्ये ठेवलेली 'ही' एक गोष्ट ठरू शकते धोकादायक; 99 % लोकं करतात चूक

कोणत्या दिशेला ठेवावं पिण्याच्या पाण्याचं भांडं?

वास्तू शास्त्रानुसार, उत्तर दिशेला पिण्याच्या पाण्याचं भांडं ठेवल्याने तुमच्या घरात सुख-शांती वाढण्यास मदत होते. त्यानुसार, पश्चिम दिशेला पाण्याचं भांडं ठेवणं शुभ मानलं जातं. याशिवाय उत्तर पूर्व दिशा देखील पाण्याचं भांडं ठेवण्यासाठी शुभ मानली जाते. किचनमध्ये या दिशांना पिण्याच्या पाण्याचं भांडं ठेवल्याने धन लाभ होण्यास मदत होते. अशा व्यक्तींची संपत्ती वाढण्याची शक्यता अधिक असते.

कोणत्या दिशेला पिण्याचं पाणी ठेवू नये?

दक्षिण पूर्ण दिशेला कधीही पिण्याच्या पाण्याचं भांडं ठेऊ नये. कारण या दिशेला अग्नीची दिशा म्हटलं जातं. या दिशेला पाणी ठेवल्यास तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. तसंच धनहानी होण्याचा धोकाही असल्याचं शास्त्रामध्ये म्हटलं गेलंय.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Drinking water kitchen
Money Plant Vastu : तुमच्या घरी कोणत्या दिशेला आहे मनी प्लांट? चुकीच्या ठिकाणी असल्यास घरावर येतील संकटं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com