Surabhi Jayashree Jagdish
वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीचे नियम दिले असून यांचा संबंध घरातील सुख, शांती आणि समृद्धीशी असणार आहे.
तुम्ही रात्री झोपताना बेडरूममध्ये पाण्याची बाटली ठेवता का?
पण रात्रीच्या वेळी बेडरूममध्ये पाण्याची बाटली ठेवणं योग्य आहे का, वास्तूशास्त्रामध्ये याबाबत काय म्हटलंय ते पाहूया.
वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये पाण्याची बाटली ठेवणं अशुभ मानलं जातं.
जर तुम्ही बेडरूममध्ये तुमच्या जवळ पाण्याची बाटली ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी अजिबात योग्य नाही. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
जरी तुम्हाला बेडरूममध्ये पाणी ठेवायचं आहे तर ते योग्य दिशेला ठेवा. बेडरूममध्ये पाणी ठेवण्याची योग्य दिशा उत्तर-पूर्व आहे.
बेडजवळ असलेल्या टेबलावर तुमच्या पाण्याची बाटली ठेवू नये. असं करणं धोकादायक ठरू शकतं.
एक की दोन..., सकाळी रिकाम्या पोटी किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?