Oil and Shampoo Applying Tips Saam TV
लाईफस्टाईल

Oil and Shampoo Applying Tips : केसांना आठवड्यातून किती वेळा तेल लावलं पाहिजे आणि शॅम्पू केलं पाहिजे? वाचा सविस्तर

How Many Times Apply Oil and Shampoo : काही तरुणी केस गळणे किंवा अन्य विविध केसांशी संबंधीत समस्या सोडवण्यासाठी काही ना काही करत असतात. बहुतेक तरुणी विविध प्रकारचे तेल केसांवर लावतात.

Ruchika Jadhav

डोक्यावर काळेभोर केस असावेत असं प्रत्येक तरुणीला आणि तरुणाला वाटत असतं. त्यासाठी केसांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. केसांची योग्य पद्धतीने निगा न राखल्यास हेअरफॉल वाढतो. केस जास्त गळतात आणि तुटतात देखील. तसेच अती प्रमाणात तेल लावल्याने सुद्धा केसांचं सौंदर्य कमी होतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांना शॅम्पू आठवड्यातून किती वेळा करावे आणि तेल कितीवेळा लावावे याची माहिती सांगणार आहोत.

तेल आणि शॅम्पूची आवश्यकता

केसांची छान वाढ व्हावी आणि त्यांना योग्य ते पोषक तत्व मिळावे यासाठी केसांना वेळोवेळी शॅम्पू केले पाहिजे. त्याने आपल्या केसांना मजबूती येते. केस पांढरे होण्यापासून वाचतात. तसेच केस जास्त गळत नाहीत. तेल आणि शॅम्पू योग्य वेळी केल्याने केसांना फाटे फुटणे, केस ड्राय होणे या अडचणींपासून सुटका मिळते.

तेल किती वेळा लावू नये?

काही तरुणी केस गळणे किंवा अन्य विविध केसांशी संबंधीत समस्या सोडवण्यासाठी काही ना काही करत असतात. बहुतेक तरुणी विविध प्रकारचे तेल केसांवर लावतात. आता तुम्ही सुद्धा असे करत असाल तर हे चुकीचं आहे. कारण तेल लावण्याचे जसे फायदे आहेत तसेच जास्त तेल लावल्याने तुम्हाला त्रास सुद्धा होऊ शकतो. जास्त तेल लावणाऱ्या व्यक्तीच्या केसांत सतत कोंडा होतो.

तेल किती वेळा लावावे?

काही व्यक्ती केसांना सतत तेल अप्लाय करतात. तसे न करता केस जास्त ड्राय असतील तर आठवड्यातून दोनवेळा आणि केस ऑयली टेक्सचरचे असतील तर आठवड्यातून एक वेळा तेल लावले पाहिजे.

रात्री झोपताना तेल लावावे का?

रात्री झोपण्याआधी कधीच केसांना तेल लावू नये. केसांना तेल लावले तर त्याने केसांमध्ये असलेला कोंडा तेल शोषून घेतो. त्यामुळे केसांत जास्त चावणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे या समस्या उद्भवतात.

शॅम्पू किती वेळा करावा?

केसांना शॅम्पू करताना ४ तास आधी तेल लावावे. केसांत जास्तवेळ तेल ठेवून शॅम्पू करू नये. शॅम्पू करताना केसांवर फक्त शॅम्पू अप्लाय करावा. यावेळी शॅम्पूने स्कॅल्पला काही हानी पोहचणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT