Right Way to Shampoo : चुकीच्या पद्धतीने शॅम्पू केल्यास केस जास्त गळतात; जाणून घ्या योग्य पद्धत

Right Way to Washing Your Hair : काही ब्युटी टिप्सचे व्हिडिओ पाहून आपणही ते फॉलो करतो. मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा टिप्स फॉलो केल्याने काही व्यक्तींना केस गळती जास्त वाढते.
Right Way to Shampoo
Right Way to Shampoo Saam TV

केसांच्या विविध समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण विविध पद्धती ट्राय करतो. केस गळणे, केसांत कोडा होणे, घाम आणि गरमीमुळे काहींच्या डोक्यात उष्णतेने फोड देखील येतात. या सर्वांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण विविध स्टाइलने केसांना शॅम्पू करतो. मात्र शॅम्पू करण्याच्या पद्धती योग्य नसल्यास आपल्या केसांवर त्याचा उलट परिणाम होतो.

Right Way to Shampoo
Food Poisoning: रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा.. ४० हून अधिक प्रवासी रुग्णालयात; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर हेअर वॉशचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. काही ब्युटी टिप्सचे व्हिडिओ पाहून आपणही ते फॉलो करतो. मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा टिप्स फॉलो केल्याने काही व्यक्तींना केस गळती जास्त वाढते. तसेच केस झपाट्याने पांढरे देखील होतात. त्यामुळे आज केस धुण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत.

काही ब्युटी एक्सपर्ट्स आणि डॉक्टरांनी देखील केसांची निगा राखण्यासाठी ते कितीवेळा वॉश करावेत याबाबत माहिती दिली आहे. तुमचे केस जास्त लांब सडक असतील तर ते आठवड्यातून किमान दोनवेळा तरी वॉश केले पाहिजेत.

डबल शॅम्पू कोणी करावं

सर्व प्रकारच्या व्यक्तींना डबल शॅम्पू केल्याने फायदा होतो. मात्र ज्यांचे केस खरोखर जास्त लांब असतील त्यांनी दोनवेळा शॅम्पू केले पाहिजे. अनेक व्यक्ती दर दिवशी केस धुतात. त्यामुळे त्यांनी डबल शॅम्पू करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सिंगल शॅम्पू न केल्यास देखील केस स्वच्छ राहतात.

शॅम्पू कसा अप्लाय कराल?

शॅम्पू अप्लाय करण्या आधी केस ओले करून घ्या. त्यानंतर केसांवर शॅम्पू अप्लाय करा. किमान ५० सेकंद केसांवर शॅम्पूने मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.ओले केस कमजोर असतात त्यामुळे ते तुटू शकतात. केस तुटूनयेत यासाठी शॅम्पू करताना केस ओढले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

या चूका टाळा

शॅम्पू करताना एकाच दिवसात दोनवेळा शॅम्पू करू नका. यामुळे नैसर्गिकरीत्या केसांत असलेलं प्रोटीन निघून जाईल आणि केस जास्तप्रमाणात गळतील. तसेच तुमच्या स्कॅल्पला देखील याने नुकसान पोहचू शकतं.

Right Way to Shampoo
Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com