ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वप्रथम १०-१५ जास्वंदीची फुले स्वछ पाण्याने धुवा. जास्वंदाच्या फुलांसोबत पानांचाही वापर करू शकता.
पाने आणि फुलांतील पाणी सुकण्यासाठी ती थोड्यावेळ पंख्याखाली ठेवा.
त्यानंतर गॅसवर मंद आचेवर एक कढई घेऊन यात खोबरेल तेल जास्वंदाची पाने आणि फुले एकत्र टाका.
कढई तशीच ६- ७ तास बाजूला ठेवून द्या. नंतर हे तेल गाळून एका बाटलीत भरून घ्या.
तयार तेल नियमित आठवड्यातून २ वेळा झोपताना मसाज करुन केसांच्या मुळांना लावा.
तेल केसांच्या मुळांना नीट लावल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.