Relationship Tips yandex
लाईफस्टाईल

Healthy Relationship Tips: लग्न ठरलंय? पार्टनरला या गोष्टी विचारल्याशिवाय पुढे जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला

Marriage planning: लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी पार्टनरशी करिअर, आर्थिक नियोजन, जीवनशैली आणि जबाबदाऱ्यांबाबत स्पष्ट चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. योग्य प्रश्न विचारल्याने नात्यात पारदर्शकता वाढते आणि भविष्यातील मतभेद टाळण्यास मदत होते.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या बदलत्या काळात लग्नाचा निर्णय हा केवळ दोन व्यक्तींमध्ये मर्यादित राहत नाही, तर दोन कुटुंबांना जोडणारा महत्त्वाचा टप्पा ठरतो. मात्र अनेकदा लग्नानंतर नात्यात दुरावा निर्माण होतो आणि सुरुवातीला सगळं व्यवस्थित असताना नंतर मतभेद का वाढतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच नातं पक्कं करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करून घेणं गरजेचं ठरतं.

या आर्टिकलमध्ये असे काही मुद्दे दिले आहेत जे तुम्ही लग्नापूर्वी तुमच्या पार्टनरला विचारू शकता. जेणेकरून तुमच्या नात्यात स्पष्टता येण्यास मदत होणार आहे.

करिअरबाबतची स्पष्टता घ्या

नातं ठरत असताना सर्वात आधी त्यांच्या करिअरबाबत चर्चा करणं गरजेचं आहे. ते त्यांच्या कामाबद्दल काय विचार करतात, भविष्यात काय योजना आहेत आणि विशेष म्हणजे ते तुमच्या करिअरला कितपत पाठिंबा देतील, हे आधीच जाणून घेतलं पाहिजे.

आर्थिक नियोजना

पैशांबाबतची समज आणि सवयी या वैवाहिक आयुष्यात महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे होणाऱ्या पतीशी मनी मॅनेजमेंटबाबत चर्चा करणं आवश्यक आहे. ते पैसे कसे साठवतात, खर्च कसा करतात आणि भविष्यात घरखर्च कसा हाताळतील याची कल्पना तुम्हाला आधी आल्यास मदत होईल.

लाइफस्टाइल

त्यांची जीवनशैली कशी आहे, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याला प्रवासाची आवड आहे का, चित्रपट बघायला आवडतात का किंवा छंद काय आहेत, यावरून तुमचं बॉन्डींग होणार आहे की नाही हे कळू शकतं.

लोनची स्थिती

होणाऱ्या पतीवर किंवा त्यांच्या कुटुंबावर कोणतं कर्ज आहे का, हे विचारणं अत्यंत गरजेचं आहे. कोणताही मोठा आर्थिक भार असेल तर त्याचा परिणाम वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट आधीच स्पष्ट केल्यास पुढच्या आयुष्यात समस्या येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakira: शकीराचा भारतातील कॉन्सर्ट रद्द; 32 हजाराचं होतं एक तिकीट, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : भोंदूबाबा अशोक खरातच्या मिरगावमधील मंदिरातील पुजाऱ्याची होणार चौकशी

Gold Rate : गुड न्यूज! चांदी तब्बल ७,२१० रूपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण, वाचा ताजे दर

Name Mangalsutra Designs: मंगळसूत्रात लिहा जोडीदाराचं नाव! 'हजबंड नेम' मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न्स

मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याला संधी?

SCROLL FOR NEXT