Liver cancer SAAM TV
लाईफस्टाईल

Liver cancer: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर लवकरच खराब होणारे; दुर्लक्ष केल्यास कॅन्सरही होऊ शकतो

Liver symptoms deterioration cancer risk: लिव्हर हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयवांपैकी एक आहे. ते रक्त शुद्ध करणं, पचनास मदत करणं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणं हे कार्य करतं.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर रक्त शुद्ध करणं, अन्न पचवणं अशा अनेक महत्त्वाच्या कामांसाठी जबाबदार असतं. जर तुम्हाला लिव्हरमध्ये काही त्रास जाणवू लागला तर शरीर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देऊ लागते. हे संकेत योग्य वेळी ओळखले नाहीत तर शरीरावर गंभीर आणि हानिकारक परिणाम होऊ शकतात.

लिव्हर हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. पचनक्रिया, ऊर्जा निर्माण करणं, रक्त शुद्ध करणं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणं या गोष्टी लिव्हरच्या माध्यमातून केल्या जातात. पण ज्यावेळी सतत तेलकट अन्न, मद्यपान, व्हायरल इन्फेक्शन, औषधांचा परिणाम किंवा अस्वस्थ जीवनशैलीमुळे लिव्हर कमकुवत होऊ लागतो, तेव्हा शरीर तुम्हाला काही लक्षणं दाखवतं. अशावेळी लिव्हरच्या कॅन्सरची लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

लिव्हर कॅन्सर का होतो?

हेपेटायटिस B आणि C

हेपेटायटिस B आणि C हे लिव्हर कॅन्सरचे प्रमुख कारणांपैकी एक आहे. जेव्हा हे व्हायरस लिव्हरमध्ये पसरतात आणि दीर्घकाळ राहतात, तेव्हा ते लिव्हरमध्ये संसर्ग निर्माण करतात. यामुळे लिव्हरमध्ये सूज येते, पुढच्या टप्प्यात सिरोसिस होते आणि शेवटी कॅन्सर होतो.

दीर्घ प्रमाणात मद्यसेवन

जर एखादी व्यक्ती रोज किंवा जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल तर त्याला लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. यामुळे फॅटी लिव्हर, फायब्रोसिस, सिरोसिस अशा गंभीर लिव्हरच्या आजारांचा धोका वाढतो.

चुकीचा आहार

जर एखादी व्यक्ती रोज किंवा मोठ्या प्रमाणात तळलेले, मसालेदार किंवा जंक फूड खात असेल तर लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते. यामुळे फॅटी लिव्हर होतो आणि पुढे कॅन्सरचा धोका वाढतो.

सिरोसिस

सिरोसिस हा लिव्हरचा गंभीर आजार आहे. यात स्कार टिश्यू निरोगी लिव्हरच्या पेशींना बदलतात ज्यामुळे लिव्हर नीट काम करू शकत नाही. या आजारामुळे लिव्हरला जखम होऊ शकते. हा लिव्हरचा सर्वात घातक आजार असून यामुळे लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

लिव्हर कॅन्सरपासून बचाव

  • हेपेटायटिस B व्हायरस हा लिव्हर कॅन्सरचं सर्वात मोठं कारण आहे. यासाठी तीन डोसची लस उपलब्ध आहे, जी 95% संरक्षण देते.

  • दीर्घकाळ मद्यपान करणं हे सिरोसिस आणि शेवटी कॅन्सरचं मोठं कारण आहे. मद्यपान कमी करणं किंवा पूर्णपणे सोडल्यास लिव्हरचं संरक्षण होतं.

  • तळलेले पदार्थ, साखर आणि जास्त चरबीचे अन्न कमी करा.

  • वजन नियंत्रित ठेवा आणि दररोज किमान 30 मिनिटे चालण्याची सवय लावा, जेणेकरून फॅटी लिव्हर होणार नाही.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket Discount News: प्रवाशांसाठी गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर मिळणार ३ टक्के सूट; वाचा काय आहे 'ही'योजना?

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

Bollywood Movies 2026: 'बॅटल ऑफ गलवान' ते 'धुरंधर २'; २०२६मध्ये प्रदर्शित होणार बॉलिवूडचे हे मोठे चित्रपट

Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

BMC Election 2026: अखेरच्या क्षणी वंचितकडून काँग्रेसला दणका, १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाही; इच्छुकांचा संताप

SCROLL FOR NEXT