Early signs of kidney stones saam tv
लाईफस्टाईल

7 warning signs of kidney failure: शरीरात 'हे' ७ बदल दिसले तर समजा किडनी होऊ शकते; वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्या

Kidney failure symptoms: आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे किडनी (Kidney). शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे, रक्तदाब नियंत्रित करणे आणि शरीरात पाण्याचे संतुलन राखणे अशी अनेक महत्त्वाची कामे किडनी करते.

Surabhi Jayashree Jagdish

  • किडनी बिघडल्याचे पहिले लक्षण लघवीत बदल असते.

  • पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे गंभीर लक्षण आहे.

  • थकवा आणि कमजोरी किडनी आजाराचा संकेत आहे.

मानवाच्या शरीरात किडनी हा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मात्र, कधी कधी किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किडनीच्या कार्यात कोणताही बदल झाला तर त्याचे संकेत तुम्हाला शरीरात दिसू लागतात.

किडनीचं कार्य बिघडण्यापूर्वी किंवा किडनी फेल होण्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला शरीरात दिसू लागतात. ही लक्षणं वेळीच ओळखली तर मोठा धोका टाळता येतो. ही लक्षणं कोणती आहे ती जाणून घेऊया.

युरिनमध्ये बदल

किडनीच्या बिघाडाचं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे लघवीत होणारे बदल. अचानक लघवीचं प्रमाण कमी होणं किंवा लघवीला फेस येणं हे किडनीमधून प्रोटीन बाहेर पडत असल्याचं लक्षण असू शकतं.

शरीरावर सूज येणं

पाय, टाच किंवा चेहऱ्यावर अचानक सूज दिसून आली तर तीही किडनीच्या त्रासाची खूण आहे. शरीरात जास्त पाणी जमा होतं, म्हणून सूज येते.

सतत थकवा जाणवणं

किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात लाल रक्तपेशी तयार करणारा हार्मोन कमी प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे नेहमी थकवा, कमजोरी जाणवते आणि शरीराचा उत्साह कमी होतो.

श्वास घेण्यास त्रास होणं

किडनीच्या आजारामुळे फुफ्फुसात पाणी साचू शकतं. त्यामुळे थोडी हालचाल केली तरी किंवा आडवं झोपल्यावरही श्वास घेण्यास त्रास होतो.

वारंवार उलटी आणि मळमळ

किडनी खराब झाल्यावर रक्तात घाण पदार्थ साठतात. त्यामुळे पोटात जळजळ, अन्नाची इच्छा कमी होणं, वारंवार उलटी होणं आणि तोंडात धातूसारखा विचित्र स्वाद जाणवतो.

त्वचेत खाज सुटणं

किडनी नीट काम करत नसल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्वचेवर सतत खाज सुटणं, कोरडेपणा दिसू लागतो. आजार जसजसा पुढे जातो तसतशी ही समस्या गंभीर होऊ लागते.

मेंदूवर परिणाम

किडनी फेल झाल्यावर त्याचा परिणाम मेंदूवरही दिसून येतो. यामध्ये गोंधळलेपणा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, स्मरणशक्ती कमी होणं अशा समस्या जाणवतात. ही स्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.

किडनीच्या आजाराचे पहिले लक्षण कोणते?

लघवीत फेस येणे किंवा प्रमाण कमी होणे हे पहिले लक्षण आहे.

किडनी बिघडल्यामुळे शरीरावर कोठे सूज येते?

पाय, टाच आणि चेहऱ्यावर अचानक सूज येते.

किडनी आजारामुळे नेहमी थकवा का जाणवतो?

लाल रक्तपेशी तयार करणारा हार्मोन कमी निर्माण होतो म्हणून.

किडनी फेल झाल्यावर श्वास घेण्यास त्रास का होतो?

फुफ्फुसात पाणी साचल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

किडनी आजारामुळे मेंदूवर कोणता परिणाम होतो?

गोंधळ, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि स्मरणशक्ती कमी होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT