Prostate Cancer Early Signs saam tv
लाईफस्टाईल

Prostate Cancer Early Signs: ही ५ लक्षणं दिसली तर समजा प्रोस्टेट कॅन्सर होणारे; पुरुषांनी त्वरित घ्यावी डॉक्टरांची मदत

Prostate cancer symptoms: प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer) हा पुरुषांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे, जो योग्य वेळी लक्षात न आल्यास जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा त्याची सुरुवातीची लक्षणे (Early Symptoms) सामान्य वाटतात आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे आजार वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • प्रोस्टेट कॅन्सर – हळू वाढणारा आजार

  • सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत

  • लघवीच्या सवयींमध्ये बदल होतो

प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीतील पेशींची असामान्य आणि घातक वाढ. प्रोस्टेट ही ग्रंथी अक्रोडाच्या आकाराची असते आणि ती मूत्राशयाच्या खाली स्थित असते. ही ग्रंथी वीर्यनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. बहुतेक वेळा हा कॅन्सर हळूहळू वाढतो आणि सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं जाणवत नाहीत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या कॅन्सरचं वेळेत निदान करणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण वेळेत उपचार सुरू झाले तर रुग्णाच्या आयुष्याची शक्यता वाढते. या आजाराची ५ महत्त्वाची लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया

लघवीत बदल दिसणं

प्रोस्टेट कॅन्सरचं पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवीच्या सवयींमध्ये बदल होणं. प्रोस्टेट ग्रंथी मूत्रमार्गाला वेढून असते. ही ग्रंथी वाढली की लघवीच्या प्रवाहात अडचणी निर्माण होतात. पुरुषांना खालील समस्या दिसून येऊ शकतात –

  • लघवी सुरू किंवा थांबवताना त्रास होणं

  • लघवीचं प्रमाण कमी होणं

  • लघवी पूर्ण न होणं

  • रात्री वारंवार लघवीला जाणं (Nocturia)

ही लक्षणं सामान्य ग्रंथी वाढीमुळे किंवा कॅन्सरमुळे दिसू शकतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त येणं

लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त दिसणं हे गंभीर लक्षण आहे. वैद्यकीय भाषेत याला हिमॅचुरिया (Hematuria) आणि हिमॅटोस्पर्मिया (Hematospermia) म्हणतात. हे प्रोस्टेट कॅन्सरचं किंवा इतर प्रोस्टेटशी संबंधित आजाराचं संकेत असू शकतं.

लैंगिक समस्या

काही रुग्णांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात लैंगिक अडचणी दिसून येतात. यात प्रामुख्याने इरेक्टाइल डिसफंक्शनचा समावेश प्रामुख्याने असतो. प्रोस्टेट ग्रंथी आणि तिच्याभोवतीच्या नसांमुळे लैंगिक क्रिया नियंत्रित होतात. कॅन्सरमुळे या क्रियांवर परिणाम होऊ शकतो.

पेल्विक भागात, कंबरेत किंवा मांडीत दुखणं

काही रुग्णांना पेल्विक भागात, कंबरेत, कूल्ह्यांमध्ये किंवा मांडीत सतत वेदना जाणवतात. काही वेळा या वेदना अधूनमधून होतात. दीर्घकाळ असा त्रास होत राहिला तर तो प्रोस्टेट कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतो.

रात्री वारंवार लघवीला जाणं

प्रोस्टेट ग्रंथीतील गाठ किंवा ट्यूमर मूत्राशयावर दबाव आणतो. त्यामुळे रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. हा त्रास झोपेवर परिणाम करतो आणि एकूण आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो.

प्रोस्टेट कॅन्सरची पहिली लक्षणे कोणती?

लघवीच्या सवयींमध्ये बदल होतो.

लघवीत रक्त येणे का धोकादायक?

हे कॅन्सरचे गंभीर संकेत असू शकते.

कॅन्सरमुळे लैंगिक समस्या होतात का?

होय, इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते.

कोणत्या वेदना कॅन्सरचे सूचक आहेत?

पेल्विक, कंबर किंवा मांडीत वेदना.

वेळेत निदान का महत्त्वाचे आहे?

उपचार यशस्वी होऊन आयुष्य वाढते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT