Fingernail black line cancer symptom saam tv
लाईफस्टाईल

Nail cancer signs: नखांवर काळी रेघ दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; कॅन्सरचं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं मत

Fingernail black line cancer symptom: अनेकदा नखांवर काळी रेघ दिसते आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ही साधी रेघ नसून ती गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. विशेषतः कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत म्हणून याकडे पाहिले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरात अनेक छोटे-छोटे बदल होत असतात. अनेकदा या बदलांकडे आपण किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतो. तुम्ही अनेकदा काही लोकांच्या किंवा तुमच्या नखांवर काळी किंवा तपकिरी रेघ पाहिली असेल. पण नखांवर दिसणारी ही छोटी रेघ कॅन्सरचं लक्षण ठरू शकते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नखांवर दिसून येणारी रेघ त्वचेच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकते. एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर तिच्या नखांचा फोटो शेअर केला. ज्यामुळे लोकांनी तिला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला.

नखांवर दिसून येणारी हलक्या काळ्या रेघेला वैद्यकीय भाषेत मेलेनोमा असं म्हणतात. ही रेघ विरळ ते गडद असू शकते. या रेषा हात किंवा पायाच्या नखांवर दिसून येऊ शकतात. काहींना जन्माच्या वेळी देखील अशी रेष दिसून येऊ शकते.

बऱ्याचदा नखांवर दिसून येणाऱ्या काळ्या रेषा गंभीर आजाराचं लक्षणं असतील असं नाही. अनेकदा त्या सामान्य कारणांमुळे असू शकतात. जसं की नखांना दुखापत होणं, पौष्टिक घटकांचा अभाव, विशिष्ट औषधांचे परिणाम आणि हार्मोनल बदल. ज्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग गडद असतो त्या व्यक्तींमध्ये नखांवर अशा रेषा दिसून येणं सामान्य असतं. याच कारणामुळे बरेच लोक ते गांभीर्याने घेत नाहीत.

जर ही काळी रेघ तुमच्या फक्त एका नखावर असेल किंवा हळूहळू खोल आणि मोठा होत असेल तर ते चिंतेचं कारण असू शकतं. काही प्रकरणांमध्ये तो Subungual मेलेनोमा नावाच्या त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जो नखेखाली होतो आणि तो खूप धोकादायक ठरतो.

ही लक्षणं गंभीर आजारांचे संकेत

  • नखं तुटणं

  • नखांचा आकार विचित्र पद्धतीने वाढणं

  • नखांच्या जवळ सूज येणं

  • नखांच्या खाली गाठ येणं

  • जखम किंवा रक्त येणं

अनेकदा अशी लक्षणं दिसली की डॉक्टर अनेकदा बायोप्सीची शिफारस करतात. कारण फक्त साध्या तपासणीने यांचं निदान करू शकत नाही. तज्ज्ञांच्या म्हणतात की, एकाच वेळी दोन नखांमध्ये कॅन्सर होणं दुर्मिळ असलं तरी त्याची चाचणी घेणं सुरक्षित आहे. लवकर निदान झाल्यास जीव वाचू शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट आमने सामने, स्लिप वाटपावरून वाद

Pani Puri Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, रेसिपी आहे खूपच सोपी

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

SCROLL FOR NEXT