Liver Disease Symptoms: ही ७ लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा, अन्यथा लिव्हर खराब झाले म्हणूनच समजा, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Liver Care: लिव्हरचे आजार अनेकदा उशिरा लक्षात येतात. थकवा, पिवळसर डोळे, पोटदुखी, पाय सुजणे अशी ७ लक्षणे जाणवली तर वेळीच तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Liver Disease  Symptoms
ही ७ लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा, अन्यथा लिव्हर खराब झाले म्हणूनच समजा, वाचा तज्ज्ञ काय सांगतात Google
Published On

आपल्या शरीरात असणारे लिव्हर हे अदृश्य आणि एक योद्ध्याप्रमाणे काम करणारे आहे. शरीरातील विषारी द्रव बाहेर काढून टाकण्यापासून ते महत्त्वाचे प्रोटीन तयार करण्यापर्यंत अनेक कामे लिव्हर करत असतं. मात्र, जसं एख्यादे यंत्र बिघाडू शकते त्याचप्रमाणे लिव्हरतातही काही बिघाड होऊ शकतो. विशेष म्हणजे, अनेक वेळा हे त्रास हळूहळू वाढत जातात आणि गंभीर अवस्थेतच लक्षात येतात. म्हणूनच, लिव्हरच्या आजारांची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणं भरपूर महत्त्वाचं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार, लिव्हरच्या समस्यांबाबत काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणं महत्वाचं आहे. ते लिव्हर खूप मजबूत असलं तरी बराचसे नुकसान होईपर्यंत रुग्णांना कोणताही त्रास जाणवत नाही. पण काही सुरुवातीची लक्षणे अशी असतात ज्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. वेळेवर लक्ष दिल्यास लवकर निदान होऊन उपचार सुरू करता येतात.

Liver Disease  Symptoms
Chanakya Niti: फक्त ५ गोष्टी करा फॉलो अन् बना करोडपती; चाणक्यांचे सीक्रेट

लिव्हरच्या लक्षणांमध्ये सतत थकवा येणं, डोळ्यात आणि त्वचेवर पिवळसर रंग येणं (पिवळ्या काविळीची लक्षणे), पोटाच्या उजव्या बाजूस वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे, पाय व गुडघे सुजणे, लघवी व शौचाच्या रंगात बदल होणे आणि कोणत्याही कारणाशिवाय त्वचेवर खाज सुटणे ही लक्षणे लिव्हरच्या त्रासाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.

लिव्हरच्या आजाराचा धोका काही व्यक्तींमध्ये जास्त असतो. जास्त प्रमाणात दारूचे सेवन करणारे, लठ्ठपणा असलेले, मधुमेहाचे रुग्ण, हेपाटायटिस बी तसचे सी या संसर्गाने ग्रस्त असलेले रुग्ण आणि कुटुंबात लिव्हरच्या विकारांचा इतिहास असलेले लोक या आजाराला बळी पडू शकतात. लिव्हरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नियमित संतुलित आहार, नियमित व्यायाम, दारूचे मर्यादित सेवन आणि वेळेवर तपासणी अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. लिव्हरच्या लहानसहान लक्षणांकडेही वेळेवर लक्ष देणे हे गंभीर आजार टाळण्यासाठी पहिले पाऊल मानले जाते.

Liver Disease  Symptoms
Dadar Hidden Gems: जोडीदारासोबत दादरमध्ये फिरताय? मग हे Hidden स्पॉट्स करा नक्की Explore

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com