Health Problems: जेवल्यानंतर लगेच पोट जड वाटतंय? या 'सायलेंट किलर' आजाराचं लक्षण असू शकतं

Early Stomach Symptoms Of Fatty Liver Disease: अनेकांना जेवल्यानंतर लगेच पोट फुगल्यासारखे वाटते. हा त्रास साधा वाटला तरी तो फॅटी लिव्हर डिसीजचे लक्षण असू शकतो. फॅटी लिव्हर हा ‘सायलेंट किलर’ मानला जातो
Early Stomach Symptoms Of Fatty Liver Disease
Early Stomach Symptoms Of Fatty Liver DiseaseGoogle
Published On

फॅटी लिव्हर डिसीज ज्याला MASLD देखील म्हटलं जातं. या समस्येमध्ये सौम्य पोटाच्या तक्रारीची लक्षणं दिसून येतात. कधीकधी, ब्लड टेस्ट किंवा स्कॅनमध्ये कोणतीही गडबड दिसून येण्यापूर्वीच शरीरात लक्षणं दिसू लागतात. वर्ल्ड जर्नल ऑफ हेपॅटोलॉजीमध्ये पब्लिश झालेल्या संशोधनानुसार, पोटफुगी, अस्वस्थ वाटणं आणि सतत पोट भरल्यासारखं वाटणं ही लक्षणं लिव्हरवर दबाव असल्याचं दाखवतात. यामुळे तुमच्या मेटाबॉलिझमवरही परिणा होतो.

वैद्यकीय भाषेत फॅटी लिव्हरला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हटलं जातं. परंतु आता त्याला मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीएटोटिक लिव्हर डिसीजही म्हणतात. हा आजार सामान्य असून अनेकदा त्याचं निदान होत नाही. त्याची लक्षणं सौम्य असतात आणि बहुतेकदा पोट किंवा पचनाशी संबंधित असतात. अशावेळी लोक साधा गॅस किंवा अपचन समजूल त्याकडे दुर्लक्ष करतात.

Early Stomach Symptoms Of Fatty Liver Disease
Dehydration: तुम्ही दिवसाला अर्धा लिटरपेक्षा कमी पाणी पिताय? तर शरीरावर होतील गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

रिसर्चमधून काय समोर आलं?

संशोधनातून असं दिसून आलंय की, फॅटी लिव्हरची पहिली लक्षणं बहुतेकदा पोटाच्या माध्यमातून दिसून येतात. अभ्यासातून असं आढळून आलंय की, अनेक रुग्णांना सामान्य ब्लड टेस्ट किंवा अल्ट्रासाऊंड असूनही ओटीपोटात सूज येणं, मळमळ होणं आणि अस्वस्थ वाटणं अशा तक्रारी जाणवतात. फॅटी लिव्हर तेव्हा होतं ज्यावेळी लिवहरमध्ये जास्त चरबी जमा होऊ लागते. अनेकदा याचा दारूशी काही संबंध नसतो. ही चरबी जमा होताना लिव्हरचा आकार वाढतो किंवा हलकी सूज येऊ शकते.

लोकं अनेकदा असं मानतात की, लिव्हरच्या समस्येमध्ये कावीळीसारखी लक्षणं दिसून येतात दिसतात. मात्र याची लक्षणं ही ओटीपोटाच्या वरच्या भागात दडलेली असतात. फॅटी लिव्हर असलेल्या लोकांमध्ये पोट फुगणं आणि लवकर भरल्यासारखे वाटणं यांचा तक्रारींचा समावेश आहे. अशामध्ये हलकं जेवल्यानंतरही पोट भरलेलं वाटू शकतं.

Early Stomach Symptoms Of Fatty Liver Disease
Cold vs hot water: थंड पाणी की गरम पाणी प्यावं? आरोग्यासाठी नेमकं काय आणि किती फायदेशीर? वाचा

फॅटी लिव्हरची इतर लक्षणं

मळमळ आणि अपचन ही देखील फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. तळलेलं किंवा जास्त जेवल्यानंतर अनेकांना मळमळ किंवा पोटात जळजळ जाणवते. ही लक्षणं खराब आहार, जास्त खाणं किंवा शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वाढू शकतात.

Early Stomach Symptoms Of Fatty Liver Disease
Breast Cancer: सतत स्तनाला खाज येतेय? ब्रेस्ट कॅन्सर तर नाही ना...; डॉक्टरांनी सांगितली महिलांनी कोणती काळजी घ्यावी!

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com