Broom Astro Tips saam tv
लाईफस्टाईल

Broom Astro Tips: घरात 'या' दिशेला झाडू ठेवाल तर व्हाल कंगाल; लक्ष्मी नाराज होण्याचा धोका

Where To Keep Broom: शास्त्रानुसार, घरातील प्रत्येक गोष्ट नियमात दिलेल्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. जर या नियमांचं पालन केलं नाही तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरण्याची शक्यता असते.

Surabhi Jagdish

घर बांधताना वास्तुशास्त्राचं पालन केल्यास फायदा होताना दिसतो. असं म्हणतात वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. वास्तू शास्त्रानुसार, घरातील काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण घरातील प्रत्येक वस्तुंचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. शिवाय या शास्त्रानुसार, घरातील प्रत्येक गोष्ट नियमात दिलेल्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे.

वास्तू शास्त्रानुसार, जर या नियमांचं पालन केलं नाही तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरण्याची शक्यता असते. याचशिवाय या नियमांचा भंग झाला तर लक्ष्मीही घरात वास करत नाही. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आयुष्यभर याचे परिणाम भोगावे लागतात. या नियमांनुसार, घरामध्ये झाडू ठेवण्यासाठी देखील विशेष जागा दिली गेली आहे.

शास्त्रानुसार झाडूचं महत्त्व

हिंदू धर्मामध्ये झाडूला विशेष महत्त्व देण्यात आलं असून झाडू केवळ घर स्वच्छ करत नाही तर ते नकारात्मकता दूर करण्यास मदत करते. त्यामुळे झाडू ठेवताना एखाद्याने चूक केली तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागू शकतात. झाडू ठेवण्याचे मुख्य नियम पाळले नाहीत तर ते एक प्रकारचे संकटाला आमंत्रणच आहे. हे नियम पाळले नाही तर घरातील व्यक्तींच्या मागे आर्थिक संकट लागू शकतं.

झाडू लक्ष्मीचं प्रतीक

हिंदू धर्मामध्ये झाडू ही लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते. यावेळी झाडूला खूप महत्त्व दिलं जातं. यासाठीच धनत्रयोदशीच्या वेळी प्रत्येक हिंदू घरात नवीन झाडू आणण्याची प्रथा आहे. झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असून जर तिला पाय लागला तर नमस्कार करावा असं म्हटलं जातं.

घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावा झाडू?

वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये झाडू ठेवण्यासाठी खास नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमांनुसार, झाडू ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम आहे. तर दुसरीकडे ईशान्य दिशा झाडू ठेवण्यासाठी अशुभ मानली जाते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शिवाय घरामध्ये नकारात्मक उर्जाही येते, अशी मान्यता आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT