KYC Bank Update Saam Tv
लाईफस्टाईल

Bank News: केवायसी न केल्याने बँक खाते बंद झाले का? पुन्हा कसे कराल सुरु, प्रोसेस पाहा

KYC Bank Update : केवायसी न केल्याने तुमचे बँक खाते बंद होऊ शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

KYC Bank Update Online

आपले सर्व आर्थिक व्यव्हार हे बँकेच्या आधारे होतात. बँकेच्या मदतीने आपण बचत खाते, एफडी उघडू शकतो. बँकेच्या सर्व कामांसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. बँकेत सर्व कामांसाठी केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी न केल्याने तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. तुमच्याही बाबतीत असे घडले असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.

जर बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हीसी केवायसी करणे अनिवार्य आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकाना ग्राहकांचे केवायसी अपडेट करण्यास सांगितले आहे. केवायसी म्हणजे तुमची सर्व माहिती बँकेत जाऊन अपडेट करणे.

तुम्ही केवायसी न केल्याने तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २९ मे २०१९ रोजी केवायसी संदर्भात परिपत्रक जारी केले होते. यानुसार, कोणत्याही बँक ग्राहकांकडे पॅन ,फॉर्म 60 किंवा बँकेत जमा केलेले कोणतेही कागदपत्र नसल्यास तुमचे खाते बंद होईल. परंतु तुम्ही हे बंद झालेले खाते पुन्हा उघडू शकता.

  • री केवायसी कसे पूर्ण कराल

  • री केवायसीची प्रक्रिया ही वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगळी असते. तुम्ही तुमचे बंद झालेले खाते पुन्हा सुरू करु शकतात. बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटनुसार, त्यांच्या ग्राहकांसाठी री केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि खाते पुन्हा सुरू करण्यासाठी 3 मार्ग आहेत.

  • सर्वप्रथम, ग्राहकांना त्याच्या बँकेच्या गृह शाखेत जाऊन री केवायसी फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागेल.

  • ग्राहकाकडे आधार कार्ड आणि मूळ पॅन कार्ड असल्यास तो व्हिडिओ कॉलद्वारे री केवायसी प्रक्रिया पूर्ण करु शकतो.

  • बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकाच्या केवायसीमध्ये कोणताही बदल नसल्यास ग्राहक ईमेल, पोस्ट किंवा कुरिअरद्वारे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म पाठवू शकता. हे केल्याने री केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.

मोबाईल अॅपवरुन करु शकता रि केवायसीची प्रक्रिया

कोटक महिंद्रा बँकने ग्राहकांना मोबाईल अॅपद्वारे री केवायसी करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम कोटक बँकेच्या अॅपवर लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला रि केवायसी करण्याचा पर्याय मिळेल. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही रि केवायसीची प्रक्रिया पूर्ण करु शकता. यानंतर तुमचे खाते पुन्हा एकदा री अॅक्टिव्हेट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संक्रांतीचा सण ठरला शोकांत; ट्रक अपघातात दोन बहिणींचा दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

Manoj Jarange: ना महायुतीला, ना महाविकास आघाडीला... निवडणुकीसाठी कुणालाही पाठिंबा नाही, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका

Thursday Horoscope: व्यवसायात भरभराट होईल पण पैसाही तितकाच खर्च होईल; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

SCROLL FOR NEXT