KTM 390 Duke launched In India : सॉलिड मायलेजसह KTM 390 Duke भारतात लाँच! ५ हजारांच्या आत बुकिंग सुरु, पाहा फीचर्स

KTM 390 Duke : केटीएमची KTM 390 Duke लाँच करण्यात आली आहे.
KTM 390 Duke launched In India
KTM 390 Duke launched In IndiaSaam Tv
Published On

KTM 390 Duke Price And Features

लोक सध्या गरजेसोबतच फॅशन म्हणून बाईक खरेदी करतात. जितकी जास्त फॅशनेबल बाईक तेवढेच जास्त मिरवायला आवडतं. या फॅशनेबल बाईकमध्ये सर्वात आधी केटीएमचं नाव येत. केटीएम ही सर्वात ट्रेडिंगची बाईक आहे. केटीएमची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बाईक आता बाजारात लाँच झाली आहे.

केटीएमची KTM 390 Duke लाँच करण्यात आली आहे. ही बाईक नवीन अपडेटसह बाजारात उपलब्ध झाली आहे. या बाईकची किंमत 3 लाख 11 हजार रुपये आहे. या बाईकमध्ये काही बदल करण्यात आले असून ती 13 हजार रुपयांनी महाग झाली आहे. या बाईकमधील सर्व फिचर्सबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

KTM 390 Duke launched In India
Raj Bhavan Mumbai Visit 2023: अवघ्या २५ रुपयांत पाहू शकता मुंबईतील राजभवन, कसे कराल बुकिंग?

बुकिंग

KTM 390 Dukeची बुकिंग ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाली आहे. बुकिंग किंमत ही 4,999 रुपयांपासून सुरू आहे. या बाईकची डिलिव्हरी लवकरच होण्याची अपेक्षा आहे. देशभरातील केटीएमच्या सर्व डिलर्सने या किंमतीतच बाईकचे बुकिंग सुरू केले आहे.

नवीन स्टाईलमध्ये अपडेट

KTM 390 Duke ला स्टाईल आणि परफॉर्मन्समध्ये नवीन अपडेट करण्यात आले आहे. बाईकला अजून चांगला लूक देण्यासाठी काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. या बाईकमध्ये एलईडी हेडलाइट लावण्यात आली आहे. हे हेडलाइट पूर्वीपेक्षा अधिक अरुंद दिसते. तसेच बूमरँग-आकाराचे डीआरएल देण्यात आले आहे. त्यामुळे बाईकला आक्रमक लुक आला आहे.

बाईकमधील इंधनाची टाकी पूर्वीपेक्षा मस्क्यूलर दिली आहे. यात स्लिप्ट-सीट सेटअप आहे. ज्यामध्ये मागील फ्रेम उघडी राहते. ही बाईक 2024 KTM 390 Duke 2023 मॉडेलपेक्षा मोठी आहे.

इंजिन आणि फिचर्स

नवीन 390 ड्यूकमध्ये मोठे 399cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन लावण्यात आले आहे. ही मोटर 44.25bhp आणि 39Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकला सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. बाईक स्लिपर क्लच आणि क्विकशिफ्टरने सुसज्ज आहे.

KTM ने आता नवीन बाईकमध्ये आणखी रायडर एड्स जोडल्या आहेत. यामध्ये लॉन्च कंट्रोल, राइड मोड (स्ट्रीट, रेन आणि ट्रॅक), आणि सर्व पॅरामीटर्सचे निरीक्षण करण्यासाठी पाच-इंच TFT डिस्प्ले जोडण्यात आला आहे. या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल, म्यूझिक कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

KTM 390 Duke launched In India
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाची मूर्ती घेताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या

नवीन 390 ड्यूकमध्ये मोठे 399cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन लावण्यात आले आहे. ही मोटर 44.25bhp आणि 39Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकला सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. बाईक स्लिपर क्लच आणि क्विकशिफ्टरने सुसज्ज आहे.

KTM ने आता नवीन बाईकमध्ये आणखी रायडर एड्स जोडल्या आहेत. यामध्ये लॉन्च कंट्रोल, राइड मोड (स्ट्रीट, रेन आणि ट्रॅक), आणि सर्व पॅरामीटर्सचे निरीक्षण करण्यासाठी पाच-इंच TFT डिस्प्ले जोडण्यात आला आहे. या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल, म्यूझिक कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

KTM 390 Duke launched In India
Anger Management Tips : तुम्हालाही लगेच राग येतो? स्वत:ला कसे ठेवाल शांत, या टिप्स फॉलो करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com