Ganesh Chaturthi 2023: बाप्पाची मूर्ती घेताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या

Ganpati Bappa idol : बाप्पाची मूर्ती घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Saam Tv

Keep These Things In Mind While Buying Ganpati Bappa Idol

येत्या आठवड्यात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असून सगळीकडे एकदम उत्साहाचे वातावरण आहे. मुर्तीकारांचे कारखाने बाप्पाच्या मुर्तींने सजले आहेत. परंतु बाप्पाची मूर्ती घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते.

बाप्पाचे घरी आगमन झाल्यावर एकदम प्रसन्न वाटते. मुर्ती घेताना आपण रंग, रुपाची पाहणी करतो. परंतु मुर्ती घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते. या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही मुर्ती आणल्यास घर अगदी सुख-समाधानाने भरुन जाईन.

Ganesh Chaturthi 2023
PCOS Awareness Month 2023 : महिलांची मासिक पाळी का चुकते? समस्या की, आजार? या लक्षणांवरुन ओळखा

1. डाव्या सोंडेची मूर्ती

बाप्पाची मूर्ती घेताना सर्व गोष्टींची विशेष पाहणी करावी लागते. सर्वात विशेष म्हणजे बाप्पाच्या सोंडेविषयी विशेष लक्ष द्यावे. नेहमी डाव्या सोंडेची मूर्ती घरी आणावी. डाव्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती म्हणतात. असं म्हणतात की, डाव्या सोंडेचा गणपती घरी आणल्याने घरात सुख-शांती नांदते.

2. बाप्पाची बसलेली मूर्ती घरी आणा

घरात बाप्पाची बसलेली मूर्ती आणल्यास धनाची प्राप्ती होती. घरात सुख-समाधान, ऐश्वर्य लाभते. असे म्हणतात की, घरात बसलेली मूर्ती आणल्यास कामात तेजी येते.

3. बाप्पाचे वाहन मूषक

बाप्पा म्हटल्यावर बाप्पाचे वाहन मूषक आपोआप त्याच्यासोबत येतोच. त्यामुळे मूर्तीत बाप्पासोबत मूषक असल्याची खात्री करा. मूषक व्यतिरिक्त पूजा केल्यास अशुभ मानले जाते.

4. योग्य दिशेस मूर्ती विराजमान करावी

बाप्पाची मूर्ती घरी आणल्यावर ती योग्य दिशेला विराजमान करावी. योग्य दिशेस मूर्ती बसवल्यावर घरात सुख-शांती लाभते. घरातील ईशान्य कोन्यात मूर्ती विराजमान करावी. त्याचबरोबर मूर्तीचे मुख उत्तर दिशेस असेल याची खात्री करा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Ganesh Chaturthi 2023
Spanich Rice Recipe :मुलांना पालक खायला आवडत नाही? पौष्टिक आणि चविष्ट पद्धतीने ट्राय करा पालक भात, पाहा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com