कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हा वाईटच असतो. मग भले तो व्यायामाचा असो किंवा खाण्याचा. त्याचप्रमाणे साखरेचा अतिरेकही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने वजनात वाढ होतेच, याशिवाय शरीरात भरपूर चरबी जमा होऊ शकते.
वाढलेल्या वजनामुळे इतर समस्याही बळावण्याचा धोका असतो. यामध्ये हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा समावेश आहे. बाजारात मिळणारे अनेक पदार्थ जसं की, कप केक, बिस्किटं, मिठाई, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. दरम्यान अति प्रमाणात साखरेच्या सेवनाने तुमच्या शरीरात काही प्रकारचे बदल दिसून येतात. हे बदल कोणते आहेत, ते पाहूयात.
तुम्हाला नेहमी सुस्ती किंवा थकवा जाणवत असेल समजून घ्या की याला अतिप्रमाणातील साखर कारणीभूत असू शकते.
जर तुम्ही जास्त प्रमाणात साखरेचं सेवन करत असाल तर तुमच्या स्पिपिंग पॅटर्नमध्ये अडचणी येऊ शकतात. यावेळी तुम्हाला झोपेच्या समस्या सतावू शकतात.
अति प्रमाणात साखर खाल्ल्याने तुम्हाला लिव्हरच्या समस्या होऊ शकतात. यावेळी जास्त साखर खाल्ल्याने नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हरचा आजार होण्याचा धोका वाढतो. यामध्ये लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते.
अति प्रमाणात साखरेचं सेवन केल्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. जास्त साखर खाल्ल्याने सर्वप्रथम तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. यावेळी तुमच्या त्वचेवर काही डाग देखील दिसून येऊ शकतात.
जास्त प्रमाणात तुम्ही साखरेचं सेवन करत असाल तर तुम्हाला डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो.
जास्त साखर खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजची कमतरता निर्माण होऊ लागते. अशावेळी व्यक्तीला अधिक प्रमाणात भूक लागते. परिणामी वजनात वाढ होण्याची समस्या दिसते. कितीही डाएटिंग करताना साखर खाणं सोडलं नाही तर त्याचा फारसा फरक तुमच्यावर दिसून येणार नाही.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.