Medicine Avoid With Milk : दूधासोबत कोणती औषधं घेणं टाळलं पाहिजे? हे आहे अचूक उत्तर!

Medicine Avoid With Milk : काहींना दुधासोबत औषधं घेण्याचीही सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का, अशी काही औषधं आहे जी, दुधासोबत घेणं टाळलं पाहिजे.
Medicine Avoid With Milk
Medicine Avoid With Milksaam tv
Published On

दूध हे एक कंम्पिट फूड मानलं जातं. दूध प्यायल्यानंतर शरीराला ते पचवण्यासाठी अधिक एनर्जी लागते. अनेकदा आपण दूधात टाकून काही पावडर किंवा इतर पदार्थ घेतो. काहींना दुधासोबत औषधं घेण्याचीही सवय असते. जर तुम्हीही असं करत असाल तर थांबा, याचं कारण म्हणजे अशी काही औषधं आहे जी, दुधासोबत घेणं टाळलं पाहिजे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामधील ही पोषक घटक तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र हेच घटक औषधांसोबत घेतल्यास हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषधं नेहमी पाण्यासोबत घेतली पाहिजेत. दरम्यान अशी कोणती औषधं आहेत, जी दुधासोबत घेऊ नये, ते पाहूयात.

Medicine Avoid With Milk
High Cholesterol : रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल; 99% लोकं करतात दुर्लक्ष

आयर्न सप्लीमेंट्स

ज्यावेळी तुमच्या शरीरात लोहाची कमतरता होते, त्यावेळी डॉक्टर तुम्हाला आयर्नच्या सप्लींमेंट्स देतात. यावेळी फेरस सल्फेट आणि फेरस ग्लुकोनेट सारख्या गोळ्या तुम्हाला देण्यात येतात. ही औषधं दुधासोबत घेतल्यास समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आयर्न सप्लींमेंट्स दुधासोबत घेणं टाळावं.

​टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक्स टॅबलेट्स

टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक्स ही औषधं चुकूनही दुधासोबत घेऊ नयेत. यामध्ये यूटीआय, श्वसनमार्गाचे इन्फेक्शन तसंच त्वचेच्या समस्यांच्या औषधांचा समावेश आहे. बॅक्टेरियल ग्रोथ थांबवणं हे या औषधांचं प्रमुख काम आहे. याचा जास्त प्रभाव हवा असल्यास ही औषधं दुधासोबत घेणं टाळावं.

थायरॉईडची औषधं

हायपोथायरॉईडीझमच्या उपचारामध्ये लेव्होथायरॉक्सिन , आर्मर थायरॉइड आणि लिओथायरोनिन सारखी औषधं वापरण्यात येतात. ही औषधं रिकाम्या पोटी घेण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु ही औषधं दुधासोबत घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय ही औषधं घेतल्यानंतर दूध पिण्यासाठी काही तासांचं अंतर ठेवणं गरजेचं आहे.

बिस्फोस्फोनेट

बिस्फोस्फोनेट ही हाडांची औषधं असून ऑस्टियोपेनिया, ऑस्टियोपोरोसिस आणि हाडांचा कॅन्सर यांचा वापर उपचारांसाठी केला जातो. ही औषधं दुधासोबत घेतल्यास फारसा परिणाम होत नाही. शिवाय ही औषधं घेतल्यानंतर २-३ तासांनी दुधाचं सेवन करावं.

Medicine Avoid With Milk
Symptoms Of Low Platelets Count: डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणं ठरू शकतं जीवघेणं; 'ही' लक्षणं दिसल्यास व्हा अलर्ट

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com