brain Tumors freepik
लाईफस्टाईल

Brain Tumor: अचानक ताप येण्यासोबत ही ४ लक्षणं दिसली तर असू शकतो ब्रेन ट्यूमरचा धोका; कसे ओळखाल संकेत?

Brain tumor symptoms: आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अचानक ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः काही गंभीर लक्षणे तापासोबत दिसल्यास ते मेंदूच्या ट्युमरचे संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपण आजारी पडलोय याचा एक मुख्य संकेत म्हणजे ताप येणं. ताप हा इतका सामान्य आहे की, लोकं गंभीरतेने त्याचा विचार करत नाही. मात्र ताप हा आपल्या शरीरातील गंभीर आरोग्य समस्यांचं लक्षण असू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ताप हा ब्रेन ट्यूमर सारख्या जीवघेण्या समस्येचं पहिलं लक्षण असू शकतो. जर तापासोबत तुम्हाला तुम्हाला इतरही लक्षणं दिसली तर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. शरीर देत असलेल्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये हे आपण पाहूयात.

अचानक जास्त ताप येणं

जर एखाद्या व्यक्तीला अचानक ताप आला तर ते एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जर मेंदूमध्ये ट्यूमर किंवा कॅन्सरची गाठ वाढत असेल तर अशी लक्षणं दिसू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णाला अचानक जास्त ताप येऊ लागतो. हे फक्त ब्रेन ट्यूमरचं लक्षण नाहीये. मेंदूमध्ये असणारं इन्फेक्शन किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात अचानक संसर्ग वाढणं हे देखील जास्त तापाचं लक्षण असू शकतं.

हलकी किंवा तीव्र डोकेदुखी

ब्रेन ट्यूमर किंवा मेंदू वाढत असणारी कॅन्सरच्या गाठीचं एक लक्षणं हे डोकेदुखी असू शकतं. ज्यावेळी मेंदूमध्ये ट्यूमर किंवा कॅन्सरची गाठ तयार होत असते तेव्हा रुग्णांना सौम्य डोकेदुखीचा त्रास होतो. हा ट्यूमर जसा मोठा होतो तसा डोकेदुखीचा त्रास अधिक तीव्र होत जातो.

हाता-पायांवरील नियंत्रण कमकुवत होणं

आपल्या शरीराचे प्रत्येक फंक्शन म्हणजेच शरीराच्या हालचाली या मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जातात. ज्यावेळी मेंदूमध्ये ट्यूमर तयार होतो तेव्हा मेंदूच्या एका भागावर त्याचा परिणाम होत असतो. मेंदूच्या त्या भागाद्वारे नियंत्रित होणाऱ्या फंक्शन्सवरील नियंत्रण कमी होऊ लागतं. ब्रेन ट्यूमर जितका गंभीर असेल तितकाच शरीराचा तो भाग जसं की एक हात किंवा एक पाय किंवा दोन्ही हात यांच्यावरी नियंत्रण कमी होऊ लागतं.

स्मरणशक्ती कमी होणं

जर मेंदूवर परिणाम झाला तर स्मरणशक्तीवरही त्याचा परिणाम होतो. हे पूर्णपणे मेंदूच्या ट्यूमरच्या आकारावर अवलंबून असतं. काही रुग्णांमध्ये पूर्णपणे स्मरणशक्ती कमी होते. मात्र काही रूग्णांमध्ये थोड्याच प्रमाणात ही स्मरणशक्ती कमी होऊ लागते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Astro : तुमचं बाळ सतत आजारी पडतंय? नजर लागलीये? मग आताच करा हा घरगुती उपाय

Nivedita Saraf: एक तास मतदान केंद्रांवर हेलपाटे...; निवडणूक आयोगाच्या भोंगळ नियोजनावर निवेदिता सराफ संतापल्या

Crime News : गावावरून वडिलांसाठी शहरात आला, मैत्रीनं घात केला; रस्त्यात गाठून विद्यार्थ्याला निर्दयीपणं संपवलं

Municipal Election: मतदारांची नावे शोधण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडून भाजपच्या अ‍ॅपचा वापर; मतदान केंद्रावरील गंभीर प्रकार

SCROLL FOR NEXT