Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : पती तुमच्यापासून काही लपवत आहे? हे प्रश्न विचारताच सत्य येईल समोर

Husband Wife Relationship : काहीवेळा विविध कारणांमुळे पती आपल्या पत्नीपासून बऱ्याच गोष्टी लपवत असतात. तुमच्या पती बद्दल सुद्धा तुम्हाला असे वाटत असेल तर आजच पतीला पुढील प्रश्न विचारा.

Ruchika Jadhav

पतीला कधीही त्याच्या कामाशी संबंधीत किंवा टेक्निकल प्रश्न विचारला की तो लगेच त्याची उत्तरे देतो. मात्र आयुष्याशी संबंधित त्याला काही विचारल्यास त्याला यावर निट बोलता येत नाही. मनातील भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाही. काहीवेळा विविध कारणांमुळे पती आपल्या पत्नीपासून बऱ्याच गोष्टी लपवत असतात. तुमच्या पती बद्दल सुद्धा तुम्हाला असे वाटत असेल तर आजच पतीला पुढील प्रश्न विचारा.

अशी कोणती गोष्ट आहे ज्याने तुला आनंद मिळतो?

पती -पत्नीच्या नात्यात दोघेही एकमेकांवर उवलंबून असतात. काही कारणास्तव जर पती नाराज असेल तर त्याचा जास्त त्रास पत्नीला होतो. तसेच पत्नी नाराज असेल तर पतीला जास्त वाईट वाटते. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी आपली पत्नी सुखी आहे का हे पती सर्वात आधी पाहतात. तुमत्या पतीला असा प्रश्न विचारल्यावर त्याने आनंदाचं कारण सांगताना तुमचं नाव घेतलं तर तुमचा पती तुमच्यापासून काहीच लपवत नाही हे समजून घ्या.

आयुष्यात तुला सर्वात जास्त कसली भीती वाटते?

प्रत्येक व्यक्तीला आपण ज्यावर सर्वाधिक प्रेम करतो त्याला गमवू नये असं वाटतं. त्यामुळे या प्रश्नावर पतीने तुम्हाला म्हणजे त्याच्या पत्नीला गमवण्याची भीती वाटते असं म्हटलं पाहिजे. जर तुमच्या पतीने मला कसलीच भीती वाटत नाही असं म्हटल्यास तो तुमच्यापासून काही तरी लपवत आहे के नक्की. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भूत किंवा काही प्राण्यांची फार भीती वाटते. त्यामुळे तुमचा पती सुद्धा या सर्व गोष्टींना घाबरत आहे का? आणि हे सर्व तो तुमच्यापासून लपवत असेल तर ते तुम्हाला लगेच समजेल.

कोणत्या गोष्टीची तुला जास्त अडचण वाटते?

प्रत्येकासाठी स्वत:चं घर सर्वात सेफ असतं. मात्र कामानिमित्त आपल्याला घराबाहेर पडावं लागतं. विविध कामांचा ओघ आणि दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींमध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टी कठीण आणि अडचणीत टाकणाऱ्या वाटतात. तुमच्या पतीच्या आयुष्यात कामात, घरात किंवा अन्य कुठेही त्याला अडचण होत असल्यास हे तुम्हाला माहिती पाहिजे. पती स्वत:हून या गोष्टी सांगत नाहीत. त्यामुळे पत्नीने त्याला हे प्रश्न विचारलेच पाहिजेत.

आयुष्यात तुला स्वत:साठी काय करायचं आहे?

प्रत्येक आपल्या आयुष्यात काही ना काही स्वप्न पाहत असतो. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पतीला मदत व्हावी म्हणून तुम्गी पतीला हा प्रश्न विचारू शकता. यामुळे तुम्हाला पतीची काय स्वप्ने आहेत ते समजेल. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणतंही ध्येय नसते त्यांना असे प्रश्न विचारल्यास ते काहीच उत्तर देत नाहीत. तसेच ज्या व्यक्ती चुकीची काही कामे करत असतात त्या व्यक्ती अशा प्रश्नांची उत्तरे देण्यापासून टाळाटाळ करतात. त्यामुळे पतीला हा प्रश्न विचारून याचं उत्तर नक्की मिळवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT