Gautam Buddha Thoughts
Gautam Buddha Thoughts Saam Tv
लाईफस्टाईल

Gautam Buddha Thoughts : अस्थिर मनाला स्थिर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गौतम बुद्धाचे विचार...

कोमल दामुद्रे

Buddha Purnima 2023 : ५ मे रोजी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा सर्वत्र साजरी केली जाईल. बुद्ध या शब्दाचा अर्थ असा की, 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' ही उपाधी त्यांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. गौतम बुद्ध हे तत्वज्ञ, ध्यानी, अध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते.

गौतम बुद्धांच्या विचारांमध्ये त्यांनी जीवन (Life) व्यवस्थापनाच्या सूत्रांचा अवलंब केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. बुद्धांनी नेहमी आपल्या मनावर संयम कसा ठेवायचा व मनाला स्थिर कसे ठेवायचे याविषयी सांगतिले आहे. बुद्धांचे हे अनमोल विचार (Thoughts) आत्मसात केल्यास मन: शांतीचे अनेक नवे मार्ग आपल्याला मिळतील.

1. जसे वादळ आल्यास कोणताही दगड हलत नाही तसेच कोणत्याही कठीण प्रसंगात माणसांने आपले मन हे शांत ठेवायला हवे.

2. शहाण्या माणसाला स्वतःच्या स्तुतीने किंवा टीकेने प्रभावित होता कामा नये.

3. ईर्ष्या आणि द्वेषाच्या आगीत जळणाऱ्या लोकांमध्ये कधीच या जगात आनंद आणि हास्य टिकू शकत नाही.

4. कठीण परिस्थितीमध्ये २ मिनिट शांतपणे त्या गोष्टीचा विचार करा जे तुम्हाला करावसं वाटतंय. ही गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा.

5. नकारात्मक (Negative) विचारांवर वेळीच मात करायला हवी. त्यामुळे मनात भिती निर्माण होते.

6. मन नेहमी कोणत्या तरी कारणांमध्ये गुंतवायला हवे ज्यामुळे मनात येणाऱ्या वाईट गोष्टींवर मात करता येते.

7. मनाला शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करणेही गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT