Gautam Buddha Thoughts : तु चाल पुढं... गौतम बुद्धांच्या विचारांनी करा दिवसाची सुरुवात, नेहमी चढाल यशाची पायरी !

Success Mantra : गौतम बुद्धांचे अमूल्य विचार माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात.
Gautam Buddha Thoughts
Gautam Buddha ThoughtsSaam Tv

Gautam Buddha Vichar : गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच लोकांना अहिंसा आणि करुणेची शिकवण दिली. गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व ५६३ मध्ये एका राजघराण्यात झाला.

गौतम बुद्धांचे अमूल्य विचार माणसाला जीवनात यशस्वी (Success) होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात. बौद्ध धर्माला मानणारे लोक भारतासह (India) अनेक देशांमध्ये राहतात. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, शांती हवी असेल तर महात्मा बुद्धांचे अमुल्य विचार एकदा वाचा चला जाणून घेऊया महात्मा बुद्धांचे कोणते विचार ज्यामुळे मनुष्य यशस्वी होतो...

Gautam Buddha Thoughts
Chanakya Niti : चाणक्य सांगताहेत, चुकूनही तुमच्या पत्नीला सांगू नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ !

महात्मा बुद्धांचे अमूल्य विचार

1. बुद्धाच्या मते, माणूस जसा विचार करतो,तसाच तो बनतो. एखादी व्यक्ती वाईट विचाराने बोलली किंवा वागली तर त्याला त्रास होतो. याउलट माणसाने शुद्ध विचाराने बोलले किंवा वागले तर त्याला जीवनात आनंद मिळतो. हा आनंद त्याची सावलीसारखी साथ कधीच सोडत नाही.

2. महात्मा गौतम बुद्धांनी म्हटले आहे की जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले आहे. जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला असेल तर विजय नेहमीच तुमचा असेल. ते तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

Gautam Buddha Thoughts
Chanakya Niti on Friendship: खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? चाणक्यांनी दिले महत्त्वाचे सल्ले

3. गौतम बुद्ध म्हणतात की वाईटावर कधीही वाईटाने मात करता येत नाही. ते संपवण्यासाठी प्रेमाची (Love) मदत घ्यावी लागते. जगातील प्रत्येक मोठी गोष्ट प्रेमाने जिंकता येते.

4. महात्मा बुद्धांच्या म्हणण्यानुसार, भविष्याची स्वप्ने पाहून सध्याच्या काळात अडकू नका. भूतकाळाची आठवण करून पश्चात्ताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणे चांगले. आनंदी राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

5. जळत असलेला दिवा ज्या प्रकारे हजारो लोकांना प्रकाश देतो, त्याच प्रकारे आनंद वाटून प्रेम वाढते. बुद्धाच्या मते, आनंद नेहमी वाटून घेतल्यास वाढतो. ते कधीच कमी होत नाही.

Gautam Buddha Thoughts
Chanakya Niti : दु:खात असताना इतरांना गोष्टी शेअर करताय? थांबा..! यामुळे तुमच्याच समस्या आणखी वाढू शकतात

6. बुद्धाच्या मते, जंगली प्राण्यापेक्षा कपटी आणि दुष्ट मित्राला घाबरायला हवे. एखादा जंगली प्राणी तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतो, पण वाईट मित्र तुमच्या बुद्धीला हानी पोहोचवू शकतो.

7. गौतम बुद्धांच्या मते जीवनातील तीन गोष्टी कधीही लपवून ठेवता येत नाहीत. ते आहेत- सूर्य, चंद्र आणि सत्य.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com