Fashion Tips Saam Tv
लाईफस्टाईल

पोरींनो, Jeans घालताना या चुका करु नका, Styling च्या या सिंपल टीप्स फॉलो करा

Fashion Tips : हल्लीच्या युगात प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे असते. आपल्या चेहऱ्याला साजेसा पेहराव करणं देखील तितकचं महत्त्वाचं असतं. आजकाल फॅशनबेल जमान्यात व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी तुमच्या कपाटात काही ठराविक कपडे असायला हवे.

कोमल दामुद्रे

Jeans Styling Tips :

हल्लीच्या युगात प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे असते. आपल्या चेहऱ्याला साजेसा पेहराव करणं देखील तितकचं महत्त्वाचं असतं. आजकाल फॅशनबेल जमान्यात व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी तुमच्या कपाटात काही ठराविक कपडे असायला हवे.

नवनवीन स्टाइलनुसार जीन्स ही लोकांची पहिली पसंती दिली जाते. कारण जीन्सला जास्त स्टायलिंग करायची गरज नसते. परंतु, आता नवनवीन स्टाइलच्या जीन्सदेखील बाजारात उपलब्ध आहे. कमी उंचीच्या मुलींपासून ते अगदीच उंच असणाऱ्या मुलींसाठी जीन्सचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये अनेक नवीन ब्रॅण्ड देखील उपलब्ध आहेत. परंतु, बरेचदा जीन्सची स्टाइल करताना आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपला डेसिंग सेन्स खराब होतो. जर तुम्हाला देखील जीन्स घालयाला आवडत असेल तर या सोप्या टीप्स फॉलो करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. जीन्सचा रंग

जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी पार्टीला किंवा कोणत्याही फंक्शनला जात असाल तर नेहमी डार्क रंगाची जीन्स परिधान करायला हवी. तर दिवसा जीन्स घालत असाल तर तिचा रंग हलका असायला हवा.

2. स्लिम फिट

स्लिम फिट जीन्स ही बारीक आणि सडपातळ मुलींना छान दिसते. अधिक जाड मुलींनी स्कीनी टाइपची जीन्स घालणे टाळावे. यामुळे तुम्ही अधिकच जाड दिसाल. ज्यामुळे तुमचा संपूर्ण लूक खराब दिसेल.

3. क्रॉप जीन्स

जर तुम्हाला गुडघ्याजवळ क्रॉप केलेली जीन्स घालायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. क्रॉप केलेली जीन्स हे गुडघ्याच्या वर किंवा खाली नसावी.

4. लूज जीन्स

फॅशनच्या (Fashion) ट्रेंडमध्ये लूज जीन्स (Jeans) ही खूप फेमस आहे. परंतु, जर त्यासाठी तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही त्याला खालून कट करत असाल तर तुमचा पूर्ण लूक खराब होईल. त्यासाठी तुमच्या उंचीला सूट होईल. अशी जीन्स चॉइस करा.

5. बेल्टिंग

जीन्स आणि बेल्टचं कॉम्बिनेशन अधिक सुंदर दिसतं असं वाटतं असलं तरी ते चुकीचं आहे. जर तुमच्या जीन्सला बेल्टची गरज असेल तर लावा. बेल्टशिवाय जीन्स कॅरी करु शकता. नाहीतर तुमचा पूर्ण लूक खराब होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अफवांचा खेळ संपला, महाडिकवाडीतील भीतीचं भूत उतरलं, पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा

SCROLL FOR NEXT