Brain Tumor  google
लाईफस्टाईल

Brain Tumor: सारखं डोकं दुखतंय? असू शकतं ब्रेन ट्युमरचं लक्षण, वेळीच व्हा सावध

Cancer Prevention: मेंदूतील ट्युमरची सुरुवातीची चिन्हं ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लवकर योग्य उपचार आणि आरोग्यदायी जीवनशैलीने या आजाराचा धोका कमी करता येतो.

Sakshi Sunil Jadhav

मेंदूतील ट्युमर म्हणजे मेंदूमध्ये असणाऱ्या पेशींमध्ये झालेल्या बदलांमुळे तयार होणारा गाठीसारखा पेशींचा समूह. या आजाराचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे Glioma आणि Meningioma आहेत. हे एकूण मेंदूच्या ट्युमरपैकी जवळपास ७५ टक्के प्रकरणांमध्ये आढळतात. हा आजार ५३ वयवर्षांच्या रुग्णांमध्ये आढळतो. भारतात दर १ लाख लोकांपैकी साधारण ५ ते १० जणांना मेंदूशी संबंधित ट्युमर होतो आणि सध्या एकूण कॅन्सरच्या तुलनेत २ टक्के आढळली आहेत. पुढे आपण या आजाराबद्दल सविस्तर कारणे आणि लक्षणे जाणून घेणार आहोत.

मेंदूच्या ट्युमरचे १०० पेक्षा अधिक प्रकार ओळखले गेले आहेत. प्रत्येक प्रकार लक्षणं, उपचार पद्धती आणि परिणामांनुसार वेगळा असतो. या आजारामुळे रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. इतर कॅन्सरच्या तुलनेत, मेंदूतील ट्युमरच्या रुग्णांच्या जगण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत फारसा फरक पडलेला नाही.

मेंदूतील ट्युमर म्हणजे मेंदूमधील काही पेशी आपोआप मोठ्या संख्येने वाढू लागतात, त्यातून गाठीसारखा पेशींचा समूह तयार होतो. काही ट्युमर Noncancerous असतात, तर काही Cancerous असतात. जरी फक्त एकतृतीयांश ट्युमर घातक असला तरी दोन्ही प्रकार आरोग्यावर परिणाम करू शकतात. गाठीचा आकार वाढल्याने मेंदूतल्या रक्तवाहिन्या, नसांवर दाब टाकतो.

प्रायमरी ट्युमर मेंदूतच तयार होतात, तर सेकेंडरी म्हणजेच Metastatic Brain Tumors हे शरीराच्या इतर भागातून मेंदूत आलेले कॅन्सर असतात. या आजाराची सुरुवातीची लक्षणं अनेकदा फारशी जाणवत नाहीत. त्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करत असतात. सकाळी डोकेदुखी, झटके येणे, बोलताना किंवा समजताना अडचण, वागणुकीत बदल, अशक्तपणा, संतुलन बिघडणे, चक्कर येणे, ऐकण्यात त्रास, बधिरपणा, मळमळ, उलटी, गोंधळ आणि दिशाभूल होणं अशी लक्षणं दिसू शकतात.

ताज्या भाज्या, फळं आणि व्हिटॅमिन ए युक्त आहार घेतल्याने मेंदूतील ट्युमर होण्याचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात आणि जीवनशैलीत बदल करून हा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि जगण्याची शक्यता वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit Photos: माधुरी दिक्षीतचं सौंदर्य पाहिलं अन् चाहते म्हणाले, अप्सरा आली इंद्रपुरीतून...

RCF कंपनीविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराला धक्काबुक्की|Video

वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार अजित पवारांच्या भेटीला; भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीत थांबणार? VIDEO

Maharashtra Live News Update: निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

Stomach cancer:तुमच्या शरीरात दिसून येणारे 'हे' संकेत आहेत पोटाच्या कॅन्सरचे; ट्यूमर तयार होण्यापूर्वी दिसतात बदल

SCROLL FOR NEXT