Biting Sandal Saam Tv
लाईफस्टाईल

Biting Sandal: नवीन चप्पल पायांना चावते? मग 'या' टिप्स फॉलो करा आणि चाला मजेत

Health Tips: लहान मुलांमध्ये नवीन कपडे घेण्याचा जो उत्साह असतो तो नवीन चपला घेतानाही असतो. मात्र जेव्हा आपण नवीन चपला घेतो तेव्हा चपला चावायला लागतात असे काहीजण म्हणतात. अनेकदा ही जखम अधिक मोठी होते. तर कधी पायावर फोड येतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपण नवीन चप्पल किंवा शूज मोठ्या उत्साहाने विकत घेतो पण काही दिवसांतच काही लोक 'शू बाईट'ने त्रस्त होतात. त्यांच्या पायांना चप्पल चावू लागते आणि त्यामुळे पायाला जखम होते किंवा फोड येतात. 'शू बाईट'मुळे लोकांना चालायला खूप त्रास होतो. या त्रासातून मुक्त होण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊयात.

पायांना चप्पल लागत असेल तर कशी काळजी घ्यावी? नवीन घेतलेली चप्पल पायांना सतत लागत असेल किंवा चावत असेल तर आपण मधाचा वापर करू शकतो. गरम पाण्यामध्ये मध मिसळून त्या पाण्याने तुम्ही पायांना मालिश करा त्यामुळे पायांना लवकर आराम मिळेल. मधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

रोज रात्री झोपताना नारळाच्या तेलाने पायांना मालिश करावी. नारळाचे तेल (coconut oil)जखम लवकर भरण्यास मदत करते.

पायांना वारंवार चप्पल लागली असेल तर हळदीचा वापर करावा कारण हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

जेथे वारंवार चप्पल लागत आहे त्या जागी बँडेज लावा त्यामुळे तुमच्या पायाला जास्त त्रास होणार नाही.

कोमट पाण्यामध्ये कच्चा बटाटा कापून त्यांचे काप जखमेवर ठेवावे त्यामुळे चप्पल लागत असलेला भाग लवकर बरा होण्यास मदत होते.

सतत चप्पल लागत असलेल्या भागावर तांदळाच्या पिठाची पेस्ट करून लावा, त्यामुळे जखम लवकर भरते आणि काळी त्वचा देखील कमी होत जाते.

लिंबाचा रस कापसाच्या साहाय्याने शू बाईट झालेल्या जागी लावा , त्यामुळे पाय लवकर बरा होतो आणि काळा डागही निघून जातो.

नवीन चप्पल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

पहिल्याच दिवसापासून चप्पल लागत असलेल्या त्या भागावर बँडेज लावावे , त्यामुळे मोठी जखम होणार नाही.

तुम्ही चप्पलांना आतल्या बाजूनेसुद्धा बँडेज लावू शकता.

कधीही पायाला घट्ट बसणाऱ्या चप्पल(chappal) किंवा शूज विकत घेऊ नये.

चप्पल किंवा बूटांमध्ये मऊ आणि ओलावा शोषून घेणारे मोजे घालावे.

शू बाईटपासून वाचण्यासाठी चप्पलांमध्ये शूज पॅड्स घालावे.

चप्पल किंवा शूज विकत घेताना त्याचे चामडे तपासून घ्यावे. पायाला मऊ वाटणारी चप्पलच नेहमी विकत घ्यावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टमध्येच बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाली, KISS करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Viral Video: होणाऱ्या नवऱ्याला पाहताच मंडपात नवरीच्या अश्रूंचा पूर; लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Motyacha Bangdya Designs : नऊवारी अन् पैठणीवर शोभून दिसतील मोत्याच्या बांगड्या, 'या' लेटेस्ट सुंदर डिझाइन्स एकदा पाहाच

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT