Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Milk Tea Side Effects: दुधाचा चहा तात्पुरता फ्रेशनेस देतो, पण वारंवार सेवनामुळे अनिद्रा, चिंता आणि तणाव वाढू शकतो. जाणून घ्या, चहाचे दुष्परिणाम आणि योग्य पर्याय कोणते आहेत.
Milk Tea Side Effects
Tea Addictiongoogle
Published On
Summary

दुधाच्या चहामध्ये कॅफिन आणि साखर जास्त प्रमाणात असते.

वारंवार सेवनामुळे झोप मोड, चिंता आणि तणाव वाढतो.

हर्बल टी आणि ग्रीन टी हे आरोग्यदायी पर्याय आहेत.

भारतात चहा हा एक दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक आहे. लोक त्यांच्या दिवसात चहाने करतात. ऑफीसमध्ये ही थकल्या माणसाच्या समोर चहा नेला की, त्यालाही अगदी फ्रेश वाटतं. असे चहाचे अनेक फायदे आहेत. मात्र चहाचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. एका संधोधनात असे आठळले आहे की, वारंवार चहाचे सेवन केल्याने तुमच्या स्वभावात मोठ्या प्रमाणात बदल होतो. नैराश्य, चिंता, तणाव आणि मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

दुधाच्या चहामध्ये साखर, कॅफिन आणि अॅडिटीव्ह असते. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होऊन तुम्हाला तणावाच्या समस्येला सामोरे जावे लागते. शिवाय तरुणामध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरुणांसाठी चहा हे एक ट्रेंडी पेय असते. त्यामुळे ते वारंवार त्याचे सेवन करतात. याने मूड फ्रेश झाल्यासारखे जरी वाटत असले तरीही, शरीरासाठी हे योग्य नाही.

Milk Tea Side Effects
Liver Cancer Signs: त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा वाढत चाललाय? लिव्हर कॅन्सरचा धोका तर नाही ना, वेळीच व्हा सावध

दुधाचा चहा पिणाऱ्यांना झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. चहामुळे छातीत जळजळ किंवा अॅसिडीची समस्या वाढते. त्यामुळे झोप व्यवस्थित लागत नाही. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुम्हाला अॅसिडीटीची समस्या जाणवू शकते. तसेच तज्ज्ञांच्या मते, गर्भवती महिलांनी चहा पिणं टाळले पाहिजे. कारण दुधाच्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. त्याने झोप येत नाही.

मानसिक आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे की, चहा पूर्णपणे वर्ज्य करणे गरजेचे नाही, मात्र त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. दुधाऐवजी ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा हर्बल टीचे सेवन केल्यास मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळता येऊ शकतो. त्यामुळे चहाच्या एका कपामध्ये मिळणारा आनंद जितका महत्त्वाचा आहे, तितकंच आरोग्याचं संतुलन राखणंही आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Milk Tea Side Effects
Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com