Parenting Tips मुलांना ताप असताना अंघोळ घालावी की नाही जाणून घ्या तज्ञ काय सांगतात  meta ai
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांना ताप असताना अंघोळ घालावी की नाही? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

Kids Healthcare : मुलांना ताप आल्यावर अंघोळ घालावी की नाही, जास्त कपडे घालावेत का आणि आहारात बदल करावा का, असे अनेक प्रश्न पालकांना पडतात. तज्ज्ञांच्या मते तापात मुलांची योग्य काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Saam Tv

आपल्या बाळासाठी काय योग्य काय वाईट याची चिंता सतत पालकांना सतावत असते. अशातच त्यांची तब्बेत बिघाडली असेल तर आई- बाबांची झोपच उडालेली असते. आजारपण अंघोळीमुळे बळावतं अस काही पालकांचे म्हणणे असतं. त्यामुळे मुलाला अंघोळ घातली जात नाही किंवा त्यांच्या जेवणाच्या वेळात, जेवणात अनेक बदल केले जातात. यामागे भावना फक्त एकच असते की, आपल मूल लवकर बरं व्हावं. पण केव्हा केव्हा हे घरगुती उपाय बाळासाठी धोकादायक ठरू शकतात.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताप आणि अंघोळ यांचा असा काही थेट संबंध नसतो. मुलाला ताप आला असेल पण जर मूल व्यवस्थित खेळत असेल, अॅटिव्ह असेल तर कोमट गरम पाण्याने अंघोळ घालू शकता. अंघोळ केल्यावर बाळाचे शरीर स्वच्छ राहील, शिवाय त्याला ताजेतवाने देखील वाटेल. उलट अंघोळ न केल्याने मुलाला अशक्तपणा जाणवेल. बाळाला थंडी लागत असेल, खूप जास्त अशक्तपणा जाणवत असेल तर कोणतेही घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मुलांना जास्त कपडे घालू नका

पालकांना वाटत असत की, जास्त कपडे घातले की मुलांना घाम येईल आणि ताप निघून जाईल, पण त्यात तत्थ नसतं. उलट जास्त कपडे घातल्यामुळे हवा खेळती राहत नाही. त्यामुळे मुलांना नेहमी हलके कपडे घातले पाहिजेत.

मुलांच्या जेवणात कोणताही बदल करू नका

बाळ जर सशक्त असेल व्यवस्थित जेवत असेल तर त्याला पौष्टिक अन्नच द्यावे. कारण ज्यावेळी शरीर तापाशी लढत असत त्यावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. अशावेळी मुलांना पोटभर आणि पौष्टिक अन्न खाऊ द्यावे.

मुलांना हायड्रेटेड ठेवा

ताप असल्यामुळे मुलांना कायम तहान लागत असते. अशावेळी डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. आहाराचा योग्य तो समतोल साधत नारळपाणी, दूध, सूप देत राहावे.

तापाची लक्षणे

सतत झोप येणे.

श्वास घ्यायला त्रास होणे.

सतत उलटी होणे.

डिहायड्रेशनची लक्षणे दिसणे.

लघवीला कमी होणे.

तापाची अधिक लक्षणे दिसल्यास क्षणाचाही विलंब न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

Phlegm : छाती-फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ मिनिटांत पडेल बाहेर, करा 'हे' ३ आजीच्या बटव्यातील सोपे उपाय

Sukanya Samriddhi Yojana: दरमहा ₹1,500 गुंतवा; मुलीच्या नावावर जमा होईल ₹8.31 लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT