यावर्षी open ai त्याचा सुपर टेक्नोलॉजीवर आधारित Chatgpt - पावर्ड स्मार्ट स्पीकर बाजारात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७ मध्ये येणार हे प्रोडक्ट एआय क्रांती मधील महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीमुळे आपण दिवसेंदिवस आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहोत. Chatgpt आता केवळ open ai केवळ सॉफ्टवेअर पर्यंत मर्यादित न राहता कंपनी यावर्षी आपला पहिला प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. अॅपलचे माजी चीफ डिजाईनर जॉनी आइव यांनी या प्रोडक्टचे डिजाईन केले असून लवकरच हे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध होणार आहे.
रिसर्चनुसार open ai एक एडवान्स व्हॉईस मॉडेल लाँच करणार आहे. जो अगदी माणसांप्रमाणे संवाद साधेल, अनेक प्रश्नांची उत्तरे देखील आरामात देऊ देईल. याचसोबत पोर्टेबिलिटीचा पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सहज कुठेही नेणे शक्य होणार आहे.
या स्मार्ट स्पीकर सोबत कॅमेरा आणि सेंसरचा वापर देखील केला जाणार आहे. याच्या मदतीने आजूबाजूचा माहोल आणि त्यानुसार उत्तर देणे Chatgpt स्पीकरला सोप्प जाणार आहे. इनबिल्ड असणारे मेकॅनिकल मुव्हमेंट संभाषण सुलभ करण्यास मदत करणार आहे. Chatgpt स्पीकर उत्तम गाणी तर ऐकवणार तर आहेच यासोबतच प्रश्नांची उत्तरे , रिमांयडर सेट, स्मार्ट होम कंट्रोल यांसारखे आवाजाशी निगडीत असणारी कामे करणे Chatgpat ai मुळे शक्य होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार open ai चे यावर्षी २०२७ मध्ये या कर्मशिअल लाँच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप कंपनीकडून या गोष्टीची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.