बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, संतुलित आहाराकडे झालेलं दुर्लक्ष आणि जंक फुडचे वाढते सेवन मैदानी खेळांचा अभाव यामुळे १ ते १५ वर्षाखालील वयोगटांत मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसतंय. आपल्या लहान मुलांचं मधुमेहापासून संरक्षण कसं केलं पाहिजे हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. जर याबाबत योग्य काळजी घेतली नाही तर यावर नियंत्रण मिळवणं कठीण असतं.
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमधील पेडियाट्रिक एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. कोचुराणी अब्राहम यांच्या सांगण्यानुसार, हल्ली खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे चयापचय करून ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी होते. शारीरिक हालचालींचा अभाव, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वाढता वापर, वाढलेला स्क्रीन टाईम ही लठ्ठपणाची शक्यता वाढते ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
पूर्वी, मुलांमध्ये मधुमेह इतका सामान्य नव्हता. मात्र हल्ली 5 ते14 वयोगटातील मोठ्या संख्येने मुले मधुमेहाशी झुंज देत आहेत. वारंवार तहान लागणे, लघवी होणे, वजन कमी होणे, थकवा येणे, मळमळ आणि उलट्या होणे, अंधुक दिसणे आणि जास्त भूक लागणे ही मुलांमधील मधुमेहाची लक्षणे आहेत.
मुलांमधील मधुमेह हा सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेमध्ये विकसित झाला आहे. दैनंदिन दिनचर्यामध्ये निरोगी आहार आणि नियमित व्यायाम यांचा समावेश केल्याने मुलांच्या चयापचय आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. पालकांनी मुलांचे जीवनमान सुधारण्यासाठी मधुमेहाचं व्यवस्थापन सुनिश्चित केलं पाहिजे.
मुलांमध्ये रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यात सातत्यपूर्ण व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यांचे मधुमेह व्यवस्थापन सुधारण्यासाठी त्यांना दररोज किमान एक तास सायकल चालवणं, पोहणं किंवा खेळ खेळणं यांसारख्या क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करा.
मधुमेह असलेल्या मुलांसाठी, योग्य आहाराचे सेवन आवश्यक आहे. तृणधान्य, ताजी फळं, भाज्या आणि प्रथिने समाविष्ट असलेल्या आहारास प्राधान्य द्या. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी साखरयुक्त पेयं आणि स्नॅक्स टाळा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठी वेळोवेळी तपासणी करणं. शारीरिक हलचाल, आहार आणि औषधांवर कशी मुलांचे शरीर कशी प्रतिक्रिया देतात याचेही निरीक्षण करा.
मधुमेहाचा सामना करण्यासाठी, विशेषतः लहान मुलांसाठी भावनिक आधार महत्त्वाची भूमिका बजावते. सातत्यपूर्ण वैद्यकीय तपासणी आणि घरात आणि शाळेत दोन्ही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे यामुळे ही परिस्थिती प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याची त्यांची क्षमता वाढवते.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्लुकोज पातळीची नियमित तपासणी करावी. जेवणाच्या आधी आणि नंतर, व्यायाम किंवा ठराविक अंतराने रक्तातील साखरेची पातळी तपासणं गरजेचं आहे. हे मुलाचे शरीर दैनंदिन क्रियांना कसं प्रतिसाद देते याबद्दल माहिती मिळते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, सातत्यपूर्ण देखरेखीमुळे गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते.
मधुमेहाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी भावनिक आधार महत्त्वाचा आहे.घर आणि शाळेत योग्य वातावरण निर्मिती केल्याने मुलांना त्यांची स्थिती व्यवस्थापित करण्यात समजून घेण्यास मदत होते. योग, ध्यान किंवा छंद जोपासणे यासारख्या तणावाचे व्यवस्थापन करणाऱ्या तंत्राचा अवलंब करणे हे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणावर सकारात्मक परिणाम करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.