Shreya Maskar
बदलापूरजवळ चंदेरी किल्ला वसलेला आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे. हा डोंगरी किल्ला आहे.
चंदेरी किल्ला ट्रेकिंगसाठी आव्हान देणारा आणि थरारक अनुभव देतो, म्हणून तो अनुभवी ट्रेकर्ससाठी चांगला पर्याय आहे.
चंदेरी किल्ला पश्चिम घाटातील सुंदर आणि विहंगम दृश्यांसाठी ओळखला जातो. हिवाळ्यात चंदेरी किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
चंदेरी किल्ला कर्नाळा, प्रबळगड आणि माथेरान यांसारख्या किल्ल्यांच्या रांगेत आहे. चंदेरी किल्ला हा प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गजवळ आहे.
चंदेरी किल्ल्यावरून प्रबळगड, कलावंतीण, इर्शाळगड, कर्नाळा आणि माथेरान यांसारख्या ठिकाणांचे विहंगम दृश्य दिसते.
चंदेरी किल्ला 'कीर्ती दुर्ग' म्हणूनही ओळखला जातो, कारण राजा कीर्ती पाल यांनी ११ व्या शतकात हा किल्ला बांधला होता.
बदलापूर किंवा वांगणी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर, तेथून रिक्षा किंवा बसने चिंचवलीपर्यंत जाता येत. त्यानंतर चिंचवलीपासून चंदेरी किल्ल्यावर चढाई करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.