Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Weight And Height Chart: जर तुम्हाला फीट आणि फाईन राहायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं. जाणून घ्या तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे?
Ideal Weight By Age
Ideal Weight By Agesaam tv
Published On

वाढलेलं वजन कमी करणं हे खूप मोठं कठीण काम असतं. मात्र तुमचं वजन जास्त आहे की कमी हे तुम्हाला कसं कळेल? मुळात उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. जर तुम्हाला फीट आणि फाईन राहायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं. तुमच्या उंचीनुसार,तुमचं वजन किती पाहिजे हे पाहूयात.

शरीराचं वजन आणि उंची यांच्यात एक संबंध आहे, जो बॉडी मास इंडेक्स (BMI) द्वारे तुम्हाला समजू शकतो. शरीराचं वजन जास्त किंवा कमी असणे आरोग्यासाठी चांगले नाही.

Ideal Weight By Age
Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

जास्त वजन असणं धोकादायक

जास्त वजनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्याचा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर, मधुमेह, हार्मोनल असंतुलन, हृदयविकार यांसारख्या समस्या भेडसावण्याची शक्यता असते.

वजन कमी असेल तर

कमी वजनामुळेही देखील अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शरीराचे वजन सामान्यपेक्षा कमी असल्यास त्याचा परिणाम शरीरातील ऊर्जा, हाडं, स्नायू यांच्यावर होतो.

Ideal Weight By Age
Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे

  • 150 cm : सामान्य वजन 43 - 57 किलो

  • 155 cm : सामान्य वजन 45 - 60 किलो

  • 160 cm : सामान्य वजन 48 - 62 किलो

  • 165 cm : सामान्य वजन 51 - 65 किलो

  • 170 cm : सामान्य वजन 54 - 68 किलो

  • 175 cm : सामान्य वजन 57 - 72 किलो

  • 180 cm : सामन्य वजन 60 - 75 किलो

  • 185 cm : सामान्य वजन 63 - 78 किलो

उंचीनुसार पुरुषांचं किती वजन असलं पाहिजे

  • 160 cm : सामान्य वजन 50 - 65 किलो

  • 165 cm : सामान्य वजन 53 - 68 किलो

  • 170 cm : सामान्य वजन 56 - 71 किलो

  • 175 cm : सामान्य वजन 59 - 75 किलो

  • 180 cm : सामान्य वजन 62 - 79 किलो

  • 185 cm : सामान्य वजन 65 - 83 किलो

  • 190 cm : सामान्य वजन 68 - 87 किलो

  • 195 cm : सामान्य वजन 71 - 91 किलो

Ideal Weight By Age
Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com