ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आल्याचा वापर हा रोजच्या दैनंदिन स्वयंपाकात केला जातो. तसेच आलं हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. सर्दि, खोकला, अपचन अशा अनेक समस्यांवर आले गुणकारक ठरते. मात्र बाजारातून आणलेलं आले ३ ते ४ दिवसांतच सुकण्यास सुरुवात होते आणि आले वाया जाते. तर जाणून घ्या महिनाभर आले कसे स्टोरेज करावे.
आल्याला माती लागलेली असते आणि ओलावा असतो, त्यामुळे स्टोरेज करण्याआधी स्वच्छ सुक्या कापडाने पुसून घ्या. आलं फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी धुवू नका. धुतल्याने ओलावा वाढतो आणि बुरशी येण्याची शक्यता वाढते.
आलं कोरडं करून एका पेपर टॉवेलमध्ये हलकं गुंडाळून घ्या. यामुळे आल्यामधील अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि आलं जास्त काळ ताजे राहून चव ही चांगली राहते.
पेपरमध्ये गुंडाळलेलं आलं एका एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजच्या व्हेजिटेबल ड्रॉवरमध्ये ठेवा.
आलं किसून किंवा छोटे तुकडे करून झिप लॉक पाउचमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवा. असे केल्यास आले १ ते २ महिने सहज टिकते.
किसलेलं आलं पाण्यात किंवा पेस्ट करून आईस ट्रेमध्ये भरा. फ्रीज झाल्यावर क्यूब्स एअरटाइट पाउचमध्ये काढून ठेवा. गरजेप्रमाणे हे क्यूब्स वापरता येतात.
आलं स्वच्छ करून काचेच्या बरणीत ठेवा आणि त्यात थोडं व्हिनेगर टाकून झाकण लावा.असं ठेवलं तर आलं खूप दिवस टिकतं.
आलं कापताना किंवा वापरताना ते नेहमी सुके असले पाहिजे. ओलसर हात, ओले भांडे वापरू नका, यामुळे आलं महिनाभर ताजं राहणं शक्य आहे.