ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कढीपत्याचा उपयोग हा प्रत्येक भाज्यांमध्ये केला जातो. कढीपत्ता हा जेवणातील महत्वाचा घटक मानला जातो. जेवणात कढीपत्ता टाकल्यास रंग, सुगंध आणि चव कायम राहते. कढीपत्ता योग्य पध्दतीने न साठवल्यास तो पटकन कोमेजतो, पण काही सोप्या घरगुती ट्रिक्सने तुम्ही तो महिनाभर ताजा ठेवू शकता. तर जाणून घ्या कढीपत्ता फ्रेश ठेवण्याचं सीक्रेट!
सुरुवातीला कढीपत्ता हलक्या हाताने धुऊन घ्या. माती किंवा धूळ असलेला कढीपत्ता लवकर खराब होतो. तसेच खराब कढीपत्त्याची पाने काढून टाका.
धुतलेला कढीपत्ता एका कापडावर पसरवून पूर्णपणे सुकवून घ्या. पाने ओली राहिली तर कढिपत्याला फंगस लागू शकते.
कढिपत्याचे देठ काढू नका. देठासकट ठेवल्यास कढीपत्ता जास्त दिवस ताजा राहतो.
एक एअरटाइट डब्बा घ्या. त्यात एका लेयरमध्ये पेपर टॉवेल ठेवा आणि त्यावर कढीपत्ता पसरवून ठेवा. पेपर ओलावा शोषून घेतो आणि कढिपत्याची पाने ताजी राहतात.
कढीपत्ता पेपरमध्ये गुंडाळून एअरटाइट बॉक्समध्ये ठेवा. हवेचा संपर्क कमी झाला की कढीपत्ता जास्त काळ फ्रेश राहतो.
हा डब्बा फ्रिजच्या व्हेजिटेबल क्रिस्पर सेक्शनमध्ये ठेवा. तिथे योग्य थंडावा आणि ओलावा मिळतो.
कढीपत्ता जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही त्याची फ्रीझिंग ट्रिकही वापरू शकता.पाने धुऊन कोरडी करून झिप लॉक बॅगमध्ये ठेवावा.