Traveling during periods saam tv
लाईफस्टाईल

Traveling during periods: मासिक पाळीमध्ये प्रवास अधिक सोपा कसा होईल? स्वतःची काळजी घेण्यासाठी आवश्यक वस्तू सोबत ठेवा

Menstrual hygiene on the go: मासिक पाळीत प्रवास करणे अनेक महिलांसाठी एक मोठे आव्हान असू शकते. वेदना, अस्वस्थता आणि स्वच्छतेची काळजी यामुळे प्रवासाचा आनंद घेणे कठीण होते.

Surabhi Jayashree Jagdish

  • पाळीत प्रवास करताना स्वतःची काळजी घ्यावी.

  • उष्णतेच्या पॅचेस पोटदुखी कमी करण्यास मदत करतात.

  • वेदनाशामक औषधे प्रवासात आराम देतात.

पाळी चालू असताना प्रवास करावा लागला तर थकवा, अस्वस्थता आणि चिडचिड वाढू शकते. भारतातील जवळपास ८३% महिलांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना जाणवतात आणि त्यांना आराम मिळावा यासाठी त्या अनेक उपाय शोधतात. मग तो प्रवास ऑफिसच्या कामासाठी असो वा सुट्टीसाठी पण बॅगेत योग्य काळजी घेणाऱ्या वस्तू ठेवल्या तर प्रवास आरामदायी होण्यास मदत होते.

डॉ. विनय पुरोहित, हेड ऑफ मेडिकल अफेयर्स, Bayer Consumer Health, India सांगतात, “पाळीच्या काळात स्वतःची काळजी घेणं हे इतर कोणत्याही गोष्टीइतकेच महत्त्वाचे आहे. प्रवासाचे नियोजन करताना वैयक्तिक आरोग्याची तयारी करणंही गरजेचं आहे. वेदना कमी करणारी औषधं आणि स्नायूंचा ताण कमी करणारी उष्णतेची पॅचेस सोबत ठेवली, तर पाळीतील त्रास कमी होतो आणि प्रवास सोपा होतो.”

प्रवासादरम्यान पोटदुखी आणि अंगदुखीवर उपाय

पाळीदरम्यान पोटाच्या स्नायूंमध्ये ताण येतो आणि सतत वेदना होतात. अशावेळी प्रवासासाठी खास बनवलेली उष्णतेची पॅचेस खूप उपयोगी ठरतात. यासोबतच सुरक्षित वेदनाशामक औषधं आणि अँटी-स्पॅस्मोडिक गोळ्या बॅगेत ठेवली, तर पोटदुखी, डोकेदुखी आणि अंगदुखीवर त्वरित आणि दीर्घकाळ आराम मिळतो.

थकवा कमी करण्यासाठी ऊर्जा देणारे पदार्थ

Supradyn सर्वेक्षणानुसार, ८१% भारतीय दिवसभर ऊर्जा कमी होत असल्याचं सांगतात. पाळीच्या काळात हार्मोनल बदलांमुळे थकवा जास्त जाणवतो आणि मूडही बदलतो. म्हणूनच प्रवासात छोट्या-मोठ्या स्नॅक्सची तयारी असावी. प्रोटीन बार, सुका मेवा किंवा डार्क चॉकलेट यामुळे पटकन ऊर्जा मिळते. यासोबतच ओआरएस किंवा कमी साखर असलेले इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स घेतल्याने शरीर हायड्रेट राहते आणि थकवा कमी होतो.

स्वच्छतेला द्या विशेष महत्त्व

पाळीदरम्यान प्रवास करताना स्वच्छता सांभाळणं खूप आवश्यक आहे. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि आरामही मिळतो. पुरेसे सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पॉन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप बरोबर ठेवा. याशिवाय pH-बॅलन्स असलेले इंटिमेट वॉश वापरा आणि अँटी-रॅश क्रीम सोबत ठेवा. यामुळे प्रवासात फ्रेशनेस टिकतो आणि अस्वस्थता कमी होते.

मासिक पाळीदरम्यान प्रवासात वेदना कमी करण्यासाठी काय उपयोगी आहे?

उष्णतेच्या पॅचेस आणि वेदनाशामक औषधे उपयोगी आहेत.

मासिक पाळीत थकवा कमी करण्यासाठी कोणते पदार्थ घ्यावेत?

प्रोटीन बार, सुका मेवा आणि डार्क चॉकलेट ऊर्जा देतात.

प्रवासादरम्यान स्वच्छतेसाठी कोणत्या वस्तू आवश्यक आहेत?

सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पॉन्स आणि pH-बॅलन्स वॉश आवश्यक आहेत.

मासिक पाळीत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काय प्यावे?

ओआरएस किंवा इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स प्यावे.

मासिक पाळीत अंगदुखीवर आराम मिळवण्यासाठी काय घ्यावे?

अँटी-स्पॅस्मोडिक गोळ्या आणि उष्णतेच्या पॅचेस घ्याव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: आमदाराच्या जावयाला आशिया कपसाठी मिळाली संधी, BCCI ने दिली महत्वाची जबाबदारी

Maharashtra Live News Update: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गणेशभक्तांवर काळाचा घाला

Maharashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी कारवाई; नगराध्यक्षांसह ६ नगरसेवक निलंबित

Maharashtra Politics: राजकीय खलबतं! राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार; पडद्यामागे काय घडतंय?|VIDEO

Relationship Tips: नातं कसं टिकवायचं? नातेसंबंध मजबूत होण्यासाठी करा 'या' चार गोष्टी

SCROLL FOR NEXT