Mango Pickle Making Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Mango Pickle Making Tips : कैरीचे लोणचे बनवताय ? लगेच खराब होते? मग या गोष्टी लक्षात ठेवा, वर्षभर टिकेल...

Kitchen Hacks : जर तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात लोणची बनवत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या. ज्यामुळे ते एकदम परफेक्ट व चविष्ट बनेल तसेच वर्षभर टिकूनही राहिल.

कोमल दामुद्रे

How To Make Pickle : लोणच्याचे नाव ऐकताच हमखास आठवण येते ती आई आणि आजीच्या हाताच्या चवीची. घरात दिसणारं ते चिनी मातीचं भांड पाहिलं की, आपल्याला लोणचं खाण्याचे डोहाळेचं जणू लागतात.

परंतु, या सगळ्याची गंमत आता जाणवता येतं नाही. बाजारामध्ये हल्ली सहज बंद डब्यात लोणची मिळतात. पण घरी (Home) बनवलेल्या लोणच्याची चव ही अधिकच चविष्ट असते. वेळेच्या अभावामुळे व शहरीकरणांमुळे हल्ली लोणची विकत आणचं जास्त सोयीस्कर वाटू लागतं. परंतु, जर तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात लोणची (Pickle) बनवत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या. ज्यामुळे ते एकदम परफेक्ट व चविष्ट बनेल तसेच वर्षभर टिकूनही राहिल.

1. लोणचे बनवताना या चुका करू नका

लोणचं फक्त कैरीपासून बनत नाही तर ते इतर अनेक पदार्थांपासूनही बनते त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि भाज्यांचे लोणचे बनवू शकता. पण लोणचे बनवताना हे लक्षात ठेवा की तुम्ही जे लोणचे बनवताना ते स्वच्छ (Clean) आणि ताजे असावे. त्यात कमी दर्जाचे पदार्थ टाकले तर त्याची चव आणि लूक आपल्याला पाहिजे तसा राहणार नाही. लोणची बनवताना एक वर्षापेक्षा जुने मसाले वापरू नका. त्यापेक्षा ताजे मसाले घेऊन बारीक वाटून घ्या. कारण बारीक पावडर मसाले वापरल्याने लोणच्याच्या तेलाचा रंग खराब होतो.

2. अति आंबटपणा नको

लोणचे बनवताना आपण ते आंबट होऊ नये म्हणून त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालणे आवश्यक आहे, परंतु यासाठी या दोन गोष्टींचे योग्य प्रमाण जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. नाहीतर लोणचे अधिक आंबट होते.

3. अधिक मीठ

जास्त मीठ देखील लोणच्याची चव आणि रंग खराब करू शकते. म्हणूनच लोणच्यामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असलेले मीठ वापरावे. त्याऐवजी, तुम्ही सामान्य मिठाऐवजी रॉक सॉल्ट वापरू शकता.

4. तेलाचा वापर

लोणचे टाकताना योग्य प्रमाणात तेलाची काळजी घेणे फार महत्वाचे आहे . अन्यथा तेल खराब होऊ शकते. खरं तर, लोणच्यामध्ये मुख्यतः मीठ आणि तेलाचा वापर ते जास्त काळ टिकावे म्हणून केला जातो, जे लोणचे खराब होण्यापासून रोखतात, तसेच त्यांच्याशिवाय लोणच्याची चव देखील बिघडते. म्हणूनच तेलाच्या प्रमाणाची पूर्ण काळजी घ्या.

5. अगोदर लोणचे काढणे

लोणच्या प्रक्रियेत प्रेम आणि काळजी तितकेच महत्वाचे आहे. पण लोक बर्‍याचदा घाईत असतात आणि ते खाण्याच्या उत्सुकतेने ते लोणचे नीट मॅरीनेट होऊ देत नाहीत. हे केवळ चवच खराब करत नाही तर त्याचे शेल्फ लाइफ देखील कमी करते. लोणचे बनवण्यासाठी काचेचे किंवा सिरॅमिकचे भांडे वापरू नका. तांबे, लोखंड, जस्त किंवा पितळेची भांडी नाही. कारण त्यात लोणचे टाकल्यास त्याची चव कडू होऊ शकते. आणि ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं; व्हॉट्सअॅप स्टेटसवर पेशव्यांचा इतिहास काढला, VIDEO

Rahul Gandhi: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', व्हिडिओ पोस्ट करत लगावला निवडणूक आयोगाला टोला| Video Viral

Maharashtra Live News Update: पुण्यात जिम ट्रेनर लेडीने लोखंडी रॉडने मारहाण करून केला तरुणाचा खून

सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

SCROLL FOR NEXT