Lemon Chutney Recipe : लिंबाच्या सालीपासून बनवा चटणी; तोंडाच्या आरोग्यासोबत पाचनशक्तीही होईल सुरळीत, पाहा रेसिपी

How To Make Lemon Chutney : लिंबाचा रस पचन सुधारण्यासोबतच जेवणाची चवही वाढवतो.
Lemon Chutney Recipe
Lemon Chutney RecipeSaam Tv

Healthy Recipe : उन्हाळ्यात अनेकदा लिंबाचा रस हा प्यायला जातो. लिंबाचा रस हा हायड्रेट राहण्यासाठी याचे सेवन केले जाते. लिंबाचा रस पचन सुधारण्यासोबतच जेवणाची चवही वाढवतो. अनेकदा लिंबूपाणी प्यायल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो.

परंतु, लिंबाच्या (Lemon) सालीचा वापर आपण अनेक वेगळ्या प्रकारे करु शकतो. लिंबाच्या सालीपासून चविष्ट आणि आरोग्यदायी चटणी बनवता येते. लिंबाच्या सालीची चटणी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो. लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबाच्या सालीची चटणीही तोंडाचे आरोग्य (Health) सुधारण्यास मदत करते. चला जाणून घेऊया लिंबाच्या सालीची चटणी बनवण्याची रेसिपी.

Lemon Chutney Recipe
Egg Hakka Noodles Recipe : चायनीज फूड टेस्ट करायचं आहे ? घरच्या घरी बनवा हॉटेलसारखं एग हक्का नूडल्स, पाहा रेसिपी

1. साहित्य:

  • लिंबाची साल - 1/2 कप

  • हळद - 1/2 टीस्पून

  • जिरे - 1/2 टीस्पून साखर (Sugar)

  • 1 टीस्पून

  • तेल - 1 टीस्पून

  • मीठ - 1/2 टीस्पून

2. कृती

  • लिंबाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी प्रथम लिंबाचे चार तुकडे करा.

  • यानंतर एका भांड्यात लिंबाचा रस काढून बिया वेगळे करा.

  • आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

  • भांड्यावर एक चाळणी ठेवा, लिंबाचा रस घेऊन त्यावर लिंबाची साले पसरवा आणि चाळणी झाकून ठेवा.

Lemon Chutney Recipe
Green Garlic Chilla Recipe : ब्लड शुगर, मधुमेह, कोलेस्ट्रॉलवर फायदेशीर ठरेल ग्रीन गार्लिक चिला, पाहा रेसिपी
  • यानंतर, लिंबाची साल चांगली वितळेपर्यंत वाफेवर शिजवा. या पद्धतीने लिंबाच्या सालीचा कडूपणाही संपेल.

  • लिंबाची साले मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि साले थंड होण्यासाठी ठेवा.

  • काही वेळाने लिंबाची साले थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाका आणि वर थोडे मीठ घाला आणि साली बारीक वाटून घ्या.

  • आता एका कढईत १ टीस्पून तेल टाकून गरम करा.

  • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकून परतून घ्या.

  • त्यानंतर काही वेळाने लिंबाचे बारीक वाटलेले मिश्रण घालून त्यात चवीनुसार हळद, साखर आणि मीठ एकत्र करून तळून घ्या.

  • २ मिनिटे शिजल्यानंतर चविष्ट लिंबाच्या सालीची चटणी तयार होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com