kesar sabudana kheer Saam Tv
लाईफस्टाईल

kesar sabudana kheer: नवरात्रीसाठी फक्त १० मिनिटांत बनवा केशर साबुदाणा खीर, वाचा ही सोपी रेसिपी

kesar sabudana kheer Recipe For Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासासाठी फक्त १० मिनिटांत बनवा केशर साबुदाणा खीर. सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी वाचा आणि देवीला नैवेद्य दाखवा.

Manasvi Choudhary

नवरात्री सणाला उपवासाचे व्रत केले जातात. नवरात्रीच्या उपवासात साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाणा खीर बनवली जाते. केशर साबुदाणा खीरेचा नैवेद्य देवी दाखवला जातो. नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. चंद्रघंटा देवीची पूजा केल्यानंतर केशर साबुदाणा खीरेचा नैवेद्य दाखवला जातो. केशर साबुदाणा खीर बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

केशर साबुदाणा खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

साबुदाणा, दूध, साखर, काजू, बदाम, किशमिश, केशर, वेलची, पिस्ता हे साहित्य घ्या.

केशर साबुदाणा खीर बनवण्याची कृती-

1) केशर साबुदाणा खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा धुवून १ तास भिजत घाला.

2) एका डिशमध्ये बदाम, पिस्ता आणि काजू बारीक चिरून घ्या. वेलची पावडर तयार करा.

3) गॅसवर एका भांड्यात दूध उकळून घ्या नंतर त्यात भिजवलेले साबुदाणा घाला शिजवून घ्या.

4) संपूर्ण मिश्रणात मनुका आणि केशर घालून एकजीव करा. यानंतर मंद आचेवर दूध चांगले उकळून घ्या.

5) साबुदाणा खीर तयार झाली क त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करा.

6) खीर चांगली ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या अशाप्रकारे केशर साबुदाणा खीर सर्व्हसाठी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Dussehra 2025 : लव्ह लाइफ, करिअर, पैशांची तंगी; सर्व समस्या होतील दूर, फक्त दसऱ्याला करा 'हे' उपाय

Railway Diwali Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, बोनस कधी मिळणार? मोठी अपडेट

Nandurbar Tribal Agitation: आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

लिव्हर कॅन्सरच्या सुरूवातीला दिसून येतं 'हे' एक लक्षण

SCROLL FOR NEXT