Navratri 2025: नवरात्रीत पायात चप्पल का घालत नाही? जाणून घ्या यामागचे नेकमं शास्त्र

Navratri Barefoot Reason: नवरात्रीत अनेकजण नऊ दिवस चप्पल न घालता अनवाणी चालतात. या परंपरेमागे धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी कारणे आहेत. यामागचा खरा अर्थ जाणून घ्या.
Navratri
Navratri Barefoot ReasonSaam Tv
Published On

सध्या सर्वत्र नवरात्र या सणाची धामधूम सुरू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक व्रत केले जातात.नऊ दिवस उपवास करतात. अनेकजण नऊ दिवस अनवानी म्हणजेच चप्पल घालत नाही. यामागे अनेकांची श्रद्धा आहे. आज आपण जाणून घेऊया नवरात्रीत चप्पल न घालण्याचे नेमके कारण काय आहे.

Navratri
Chandraghanta Devi: नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित, 'या' मंत्राचा जप केल्याने मनातील इच्छा होतील पूर्ण

हिंदू धर्मात नवरात्री सणाला विशेष महत्व आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये अनेकजण कडक व्रत पाळतात. अनवाणी चालतात. हिंदू धर्मात अनेक प्रथा परंपरा आहेत ज्या आपण आजही पाळत आलोय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे संस्कार केले जातात. तुम्हाला देखील नवरात्रीमध्ये पायात चप्पल न घालता का चालतात? असा प्रश्न पडलाच असेल. मात्र यामागची परंपरा नेमकी काय आहे. हे सविस्तरपणे जाणून घ्या.

पूर्वीच्या काळी चप्पल्या या फायबर, रबर, प्लास्टिक या साहित्यापासून बनवल्या जात नव्हत्या. त्या काळी चपला बनवण्यासाठी चामडे वापरायचे. चामडे मिळवण्यासाठी प्राण्यांचा बळी दिला जायचा. याचनिमित्ताने नवरात्र सणाच्या काळात चामडे परिधान करण्यास वर्ज्य मानले गेले.

Navratri
Shardiya Navratri 2025: नवरात्रीत धनप्राप्तीसाठी करा हे ७ सोपे उपाय, पैशांची होईल भरभराट

पूर्वी देवींचे मंदिरे हे उंच टेकड्यावर असायचे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जमिनीत पाणी मुरून ओलावा निर्माण झालेला असतो. मंदिरात जाण्यासाठी डांबरी रस्ते नव्हते. पायवाट असायची यामुळे अशा ठिकाणी लोक अनवाणी जायचे.

चप्पल न घालता चालण्याचे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. असं मानलं जातं या काळात पृथ्वी उबदार असते. यामुळे अनवानी चालल्याणे उष्णता शरीरात पोहचते. अनवानी चालल्याने पायांद्वारे अॅक्यप्रेशर मिळते. शरीर निरोगी राहते.

Navratri
Hairstyles For Navratri: नवरात्रीसाठी खास 5 युनिक हेअरस्टाईल्स, लेहेंगा-चोळीमध्ये उठून दिसेल तुमचा लूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com